IND vs ENG 2nd Test 2021: भारत आणि इंग्लंड संघात चेन्नई येथे खेळल्या जाणार्या दुसर्या कसोटी सामन्यात यजमान भारतीय संघाने इंग्लंडवर आपली पकड घट्ट करण्यास सुरूवात केली आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात 329 धावा केल्या असताना इंग्लंड पहिल्या डावात केवळ 134 धावांवर गडगडला. संघासाठी विकेटकीपर खेळाडू बेन फोक्स भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यात सक्षम ठरला. त्याने संघासाठी पहिल्या डावात सर्वाधिक 42 धावांची नाबाद खेळी केली. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवशी क्षेत्ररक्षण दरम्यान भारतीय खेळाडूही काही मजेशीर मूडमध्ये दिसले. सामन्यादरम्यान, एकीकडे कर्णधार विराट कोहली प्रेक्षकांसमवेत मजा करताना दिसला तर त्याचवेळी संघाचा सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि युवा यष्टीरक्षक खेळाडू रिषभ पंत हास्य विनोद करताना दिसले. (IND vs ENG 2nd Test 2021: विराट कोहलीच्या अपीलवर 'Whistle Podu' ने गुंजले चेपॉक, Video पाहत म्हणाल- वाह कॅप्टन!)
टीम इंडियाचे माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने मैदानामधील दोन्ही खेळाडूंमधील 'ब्रोमान्स'चा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून तो जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा पंतच्या डोक्यावर प्रेमाने टपली मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना सेहवागने "हाहाहा... #पंत #रोहित #टपली" असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. अश्विनने 50व्या ओव्हरमध्ये ऑली स्टोनला बाद केले. रोहितने शॉर्ट मिड विकेटलास्टोनचा झेल घेतला. त्यानंतर जेव्हा सर्व खेळाडू विकेट सेलिब्रेशनसाठी एकत्र आले, त्यावेळी रोहितने पंतच्या डोक्यात टपली मारली.
View this post on Instagram
दुसर्या कसोटी सामन्याबाबत टीम इंडियाने दुसर्या डावात फलंदाजी करत 7 विकेट गमावून 202 धावा केल्या आहेत. रविचंद्रन अश्विन 81 चेंडूत 56 धावा करून खेळत आहे तर विराट कोहलीला 149 चेंडूत 62 धावांवर मोईन अलीने माघारी पाठवलं. यजमान टीम इंडियाने आतापर्यंत इंग्लंडवर 397 धावांची आघाडी घेतली आहे.