जो रूट (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 2nd Test: लॉर्ड्सच्या (Lords) ऐतिहासिक मैदानावर भारत (India) आणि विजयात इंग्लंड कर्णधार जो रूट (Joe Root) मोठा अडथळा बनला आहे. 23/2 धावसंख्येपासून फलंदाजीला आलेल्या रूटने यजमान इंग्लंडला (England) तिसऱ्या दिवशी तीनशे धावसंख्येचा उंबरठ्यावर नेले आहे. भारताचा पहिला डाव 364 धावांवर गुंडाळल्यावर इंग्लंडने आतापर्यंत 267/4 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. रूटने पुन्हा एकदा संघाचे बॅटने पुढाकाराने नेतृत्व केले आणि लॉर्ड्सवर भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावले. रूटच्या कसोटी कारकिर्दीतील हे 22 वे शतक आणि कर्णधार म्हणून इंग्लंडसाठी हे त्याचे 11 वे शतक आहे. रूटसाठी 2021 हे वर्ष आतापर्यंत उत्तम ठरले आहे. यंदा तो कसोटी क्रिकेटमध्ये 62 च्या सरासरीने धावा करत आहे. तसेच हे त्याचे 5 वे शतक आहे. या शतकासह रूटने अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. (IND vs ENG 2nd Test: इंग्लिश चाहत्यांचे आक्षेपार्ह कृत्य! KL Rahul वर लॉर्ड्स स्टँडवरून फेकले बिअर कॉर्क, पाहा विराट कोहलीची प्रतिक्रिया)

1. भारताविरुद्ध सर्वाधिक शतकांच्या यादीत जो रूटचे भारताविरुद्ध हे 7 वे शतक आहे. यासह गॅरी सोबर्स, विव रिचर्ड्स, रिकी पाँटिंग आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या भारताविरुद्ध सर्वाधिक 8 शतकांसह तो यादीत दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.

2. इंग्लंड कर्णधार म्हणून रूटचे हे 11 वे शतक आहे आणि या शतकासह त्याने इंग्लिश संघाचे महान फलंदाज ग्राहम गूचची बरोबरी केली आहे. गूच यांनी आपल्या कारकिर्दीत कर्णधार म्हणून 11 शतकेही केली होती, या यादीत रूट आता अॅलिस्टर कुकच्या मागे आहे, ज्याने कर्णधार म्हणून 12 शतके केली आहेत.

3. 2021 मध्ये रूटचे हे 5 वे शतक आहे आणि यंदा सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो अव्वल स्थानावर आहे. रूटपाठोपाठ पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, पॉल स्टर्लिंग आणि करुणारत्ने प्रत्येकी 3 शतकांचा आहेत.

4. यासह, कर्णधार म्हणून इंग्लंडसाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकांचा विक्रम रूटच्या नावावर झाला आहे. रूटचे हे वर्षातील पाचवे शतक असून यापूर्वी एका वर्षात सर्वाधिक शतकांचा विक्रम गूच आणि माइकल एथरटन यांच्या नावावर होता, ज्यांनी अनुक्रमे 1990 आणि 1994 मध्ये 4 शतके केली होती.

5. इतकंच नाही तर रूटने इंग्लंड फलंदाज म्हणून 9000 कसोटी धावांचाही पल्ला गाठला आहे. रूटच्या पुढे आता माजी कर्णधार कूक आहे ज्याने टेस्ट करिअरमध्ये इंग्लंड संघासाठी सर्वाधिक विक्रमी 12,472 धावा चोपल्या आहेत.

6. रूटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील हे 38 वे शतक होते आणि त्याने माजी खेळाडू अॅलिस्टर कुकची बरोबरी केली, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये इंग्लंडसाठी एकूण 38 शतके केली होती.

दरम्यान, ब्रिटिश कर्णधार रूटच्या चिवट फलंदाजीने टीम इंडियाच्या हातून पहिल्या डावात मिळवलेली मोठी आघाडी निसटताना दिसत आहे. केएल राहुलच्या ऐतिहासिक 129, रोहित शर्माच्या 83 धावा व अन्य खेळाडूंच्या छोटेखानी योगदानाने भारतीय संघाने 364 धावांपर्यंत मजल मारली होती. पण रूट पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावला आणि मोर्चा सांभाळला.