विराट कोहली आणि आर अश्विन (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 2021: रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) गुरुवारी कसोटी क्रिकेटमध्ये 400 विकेट घेणारा भारताचा (India) चौथा स्पिनर आणि जगातील सहावा स्पिनर ठरला. या कामगिरीनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) म्हणाला की, आता आपण अश्विनला नव्या नावाने बोलावणार. अश्विनने इंग्लंड विरुद्ध अहमदाबाद (Ahmedabad) येथे खेळल्या गेलेल्या डे/नाईट टेस्टच्या दुसर्‍या दिवशी दुसर्‍या डावात जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) बाद करत ही कामगिरी केली. अश्विनने तिसर्‍या कसोटीत एकूण सात विकेट घेतल्या आणि आता त्याने कसोटी क्रिकेटमधी एकूण 401 विकेट्स घेतल्या आहेत. 34 वर्षीय अश्विनने आपल्या कारकिर्दीतील 77व्या सामन्यात हा आकडा पार केला आणि 400 विकेट घेणारा तो जगातील 16वा गोलंदाज ठरला. अश्विन सामन्यानंतर म्हणाला, “400 विकेट गाठल्यानंतर फारच छान वाटतंय. संपूर्ण स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या. आमचा संघ जिंकला याचा आनंद झाला. गेल्या दोन-तीन महिन्यांत काय घडले हे मी खरोखर सांगू शकत नाही. हा एक चांगला प्रवास आणि कल्पनेपेक्षा कमी नाही.” (IND vs ENG 3rd D/N Test: ‘बापू थारी बॉलिंग कमल छे!’ विराट कोहलीची गुजराती ऐकून हार्दिक, अक्षरला फुटले हसू, पहा व्हायरल Video)

दुसरीकडे अश्विनविषयी बोलताना कोहली म्हणाला की, “अश्विनने जे योगदान दिले आहे त्याबद्दल आपल्याला उभे राहण्याची आणि अभिमान बाळगण्याची गरज आहे असे मला वाटते. अश्विन कसोटीतील मॉडर्न डे लीजेंड आहे आणि मी अश्विनला सांगितले आहे की आता मी त्याला नवीन 'लेज' नावाने बोलावणार कारण तो काऱोखर तो कसोटी क्रिकेटमध्ये आधुनिक युगातील महान क्रिकेटपटू आहे. एका कर्णधाराच्या रुपात मी खूप आनंदी आहे की, अश्विनसारखा खेळाडू माझ्या संघाचा भाग आहे.” शिवाय, इंग्लंडविरुद्ध अश्विनच्या कसोटी मालिकेतील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 3 सामन्याच्या 5 डावात फलंदाजी करताना त्याने 176 धावा केल्या आहेत आणि सर्वाधिक 24 विकेट्सही घेतल्या आहेत.

दरम्यान, अश्विन सर्वात जलद 400 कसोटी विकेट्स घेणारा जगातील पहिला भारतीय तर जगातील दुसरा वेगवान गोलंदाज ठरला. त्याने आपल्या 77व्या कसोटीत हा आकडा गाठला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात जलद 400 कसोटी विकेट घेण्याचा रेकॉर्ड श्रीलंकन फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे ज्यांनी 72व्या कसोटी सामन्यात विश्वविक्रम नोंदवला.