हार्दिक पांड्या, विराट कोहली आणि अक्षर पटेल (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 3rd D/N Test: इंग्लंडविरुद्ध (England) नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या 4 सामन्यांच्या मालिकेच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात अक्षर पटेलने (Axar Patel) 70 धावा देत 11 विकेट घेतल्या आणि सामनावीर ठरला. दोन दिवसात संपुष्टात आलेल्या सामन्यात अक्षरच्या फिरकीची चहुबाजूने कौतुक होत असताना टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) देखील लोकल बॉयचे कौतुक करण्यापासून स्वतःला आवरू शकला नाही, पण एका वेगळ्याच अंदाजात. विराट कोहलीने गुजराती भाषेत अक्षरचे कौतुक केले जे ऐकून हार्दिक पांड्या आणि अक्षरला हसू फुटले. भारतीय संघाने मोटेरा येथे इंग्लंडविरुद्ध दोन्ही डावात रविचंद्रन अश्विन आणि अक्षरने आपल्या फिरकी गोलंदाजीवर नाचवलं. इंग्लंडचा 112 धावांवर गुंडाळल्यावर यजमान भारतीय संघाचा पहिला डावही 145 धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावात 6 विकेट घेणाऱ्या अक्षरने दुसऱ्या डावात 5 विकेट घेतल्या. (IND vs ENG 3rd D/N Test: ‘मोटेराची खेळपट्टी आव्हानात्मक, खेळण्यासाठी योग्य की नाही ICC ने घ्यावा निर्णय’, पराभवानंतर जो रूटची प्रतिक्रिया)

सामन्यानंतर हार्दिक पांड्याशी झालेल्या संभाषणात कोहलीने स्थानिक भाषेत थट्टा करत अक्षरचे कौतुक केले. “आए बापू थारी गोलंदाजी कमल छे”, गुजराती भाषेत कोहली म्हणाला ज्याचे भाषांतर असे आहे: “मित्रा, तुझी गोलंदाजी कमाल आहे.” कोहलीने कॅमेर्‍यावर गुजराती बोलण्याचा प्रयत्न करतांना पाहून हार्दिक आणि अक्षरला देखील हसू अनावर झाले. पहा मजेदार घटनेचा व्हिडिओ.

चेन्नई येथील दुसऱ्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या अक्षरने आता सलग तिसऱ्यांदा 5 विकेट घेतल्या आहेत. यापूर्वी, मुलाखती दरम्यान अक्षरने सांगितले की कुटुंब, मित्र आणि विशेषतः हार्दिकने पुनरागमन करण्यास कशी मदत केली याबद्दल सांगितले. अक्षर म्हणाला, “जेव्हा मी तीन वर्षांपासून टीम इंडियाबाहेर होतो, तेव्हा मी विचार करत असे की माझी बॉलिंग व फलंदाजी सुधारण्यासाठी मी माझ्या खेळावर कसे काम करू शकेन. बरेच मित्र विचारत होते की जेव्हा मी आयपीएल आणि भारत अ संघासाठी सातत्यपूर्ण काम करत होतो तेव्हा मी संघात का नव्हतो, तेव्हा ते माझ्या मनातही होते.” अक्षर पुढे म्हणाला, “परंतु मला माहित आहे की मला योग्य वेळी प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. माझ्या मित्रांनी आणि कुटुंबीयांनी गेल्या 2-3 वर्षात मला खूप मदत केली आणि आपण (हार्दिक) त्यापैकी एक आहात. मी माझ्या कठीण काळात सर्वांकडून बरेच काही शिकलो. म्हणून मी त्यांना क्रेडिट देऊ इच्छितो.”