IND vs ENG 2021: भारतीय संघ (Indian Team) जुलै महिन्यात इंग्लंड (England) दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडिया (Team India) नॉटिंघम (Nottingham) येथे त्यांच्या स्वत:च्या ‘अ’ संघाविरुद्ध (India A) सराव सामना खेळेल. भारतीय संघाला इंग्लंडमध्ये ऑगस्ट-आणि सप्टेंबर महिन्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेचा पहिला सामना 4 ऑगस्टपासून नॉटिंघॅममध्ये खेळला जाईल. नॉटिंगहॅमशायर काउंटी क्रिकेट क्लबने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘या उन्हाळ्यात आपण काउन्टीच्या मैदानावर जगातील काही सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू खेळताना पाहाल. मग आम्ही भारत आणि भारत ए यांचे स्वागत करू.’’ इंग्लंड आणि भारत संघातील दौऱ्यावरील दुसरा सामना (12 ते 16 ऑगस्ट), तिसरा टेस्ट (25 ते 29 ऑगस्ट) लीड्स तर लंडनमध्ये चौथा टेस्ट (2 ते 6 सप्टेंबर) आणि मॅन्चेस्टरमध्ये (10 ते 14 सप्टेंबर) खेळला जाईल. (IND vs ENG Test Series 2021: भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन टेस्ट मॅच प्रेक्षकांविना, चेपॉक स्टेडियमवर खेळले जाणार दोन्ही सामने)
टीम इंडिया नॉटिंघम येथे भारत अ संघाविरुद्ध सराव सामने खेळणार जे त्यांच्यासाठी फायद्याची गोष्ट आहे करत मालिकेतील पहिला कसोटी सामना नॉटिंघम येथेच खेळला जाणार आहे. त्यामुळे, टीम इंडियाला तेथील परिस्थितीशी जुळवून घेणे फायद्याचे ठरेल. भारतीय संघाने 2018 मध्ये इंग्लंड दौरा केला होता. आपला सर्वोत्तम खेळ करूनही महत्त्वाच्या क्षणी संघाला उत्तम कामगिरी करता न आल्याने 4-1 ने मोठा पराभव सहन करावा लागला होता. संघाला पराभव पत्करावा लागला असला तरी संपूर्ण मालिकेत खेळाडूंनी इंग्लंड संघाला पूर्ण आव्हान दिले होते. अशास्थितीत, यंदा भारतीय संघ उत्तम कामगिरी करत मालिका विजय मिळवेल अशी चाहत्यांची अपेक्षा असेल.
दुसरीकडे, भारत दौऱ्यावर इंग्लंडविरुद्ध मालिका 5 फेब्रुवारीपासून सुरु होईल. या मालिकेत चार कसोटी, पाच टी-20 आणि तीन वनडे सामने खेळले जाणार आहेत. ही मालिका फेब्रुवारीमध्ये सुरू होऊन मार्चच्या अखेरपर्यंत खेळली जाईल. या मालिकेपूर्वी दोन्ही संघाचा आत्मविश्वास उंचावला असेल. नुकत्याच संपुष्टात आलेल्या चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला टीम इंडियाने 2-1 असे पराभूत केले तर इंग्लंड संघाने श्रीलंकेचा 2-0 ने क्लीन स्वीप केला होता.