IND vs ENG 2021: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (International Cricket Council) गुरुवारी इंग्लंड (England) आणि भारत (India), या दोन्ही संघांना नॉटिंगहम कसोटीतील (Nottingham Test) स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावला. इंग्लंड आणि भारत यांच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) 2021-23 मध्येही प्रत्येकी दोन गुण वजा झाले आहेत. आयसीसीच्या (ICC) निवेदनानुसार, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) 2021-23 क्रमवारीत दोन्ही संघांचे प्रत्येकी दोन गुण वजा कमी करण्यात आले आहेत. “पॉइंट कपात व्यतिरिक्त, यजमान इंग्लंडला संथ ओव्हर रेटसाठी त्यांच्या मॅच फीच्या 40 टक्के दंड आकारला गेला आहे, तर विराट कोहलीच्या टीम इंडियाला मॅच रेफरी क्रिस ब्रॉडने 40 टक्के दंड ठोठावला आहे,” आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे. (IND vs ENG 2nd Test: भारताविरुद्ध दुसऱ्या लॉर्ड्स टेस्टसाठी साकिब महमूदचा इंग्लंड संघात समावेश, पण ‘या’ खेळाडूची झाली एक्सिट)
पावसाने बाधित ट्रेंट ब्रिज स्टेडियमवरील इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. खेळ समान रीतीने सुरू असताना एकही चेंडू न टाकता खेळ रद्द करण्यात आला ज्यामुळे चाहत्यांसह दोन्ही अंतिम दिवशी दोन्ही संघांची निराशा झाली. सामना अनिर्णित राहिल्यानंतर दोन्ही संघांना 2021-23 जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येकी चार गुण देण्यात आले होते. मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉडने दोन्ही संघांना स्लो ओव्हर रेटसाठी दोषी ठरवले, ज्यानंतर दोन्ही संघांच्या खात्यातून प्रत्येकी दोन गुण पेनल्टी म्हणून कापले आणि आता दोघांचेही चारऐवजी प्रत्येकी दोन गुण आहेत. दोन्ही संघ आता गुरुवारी, 12 ऑगस्ट रोजी लॉर्ड्सवर दुसऱ्या कसोटीत भिडतील आणि आयसीसी WTC टेबलमध्ये त्यांच्या नावावर पहिला विजय मिळवण्याच्या आहेत असतील.
England and India have been fined and docked two points each from their ICC World Test Championship 2021-23 tally for slow over-rates in the Nottingham Test.
Details 👇#ENGvIND | #WTC23https://t.co/tthEorqDe9
— ICC (@ICC) August 11, 2021
दरम्यान, स्लो ओव्हर रेटमुळे टिम पेनच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात प्रवेश करण्यात अपयशी ठरला होता. डब्ल्यूटीसी अंतिम फेरी गाठण्याच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी दरम्यान स्लो ओव्हर रेटमुळे चार गुण कापण्यात आले होते. दक्षिण आफ्रिका दौरा पुढे ढकलल्यानंतर पेन आणि कंपनीला जागतिक कसोटी अजिंक्यपद गुण मिळवण्याची ती शेवटची संधी होती. तथापि, भारतीय संघाकडे इंग्लंडविरुद्ध मालिका गुण मिळवण्यासाठी संधी होती. यामध्ये त्यांनी 3-1 असा विजय मिळवून न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला.