IND vs ENG 1st Test 2021: चेन्नई (Chennai) येथे भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात खेळल्या जाणार्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडचा डाव 578 धावांवर आटोपल्यावर टीम इंडियाने (Team India) तिसऱ्या दिवसाखेर 6 बाद 257 धावा केल्या आहेत. इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघ (Indian Team) अद्याप 321 धावांनी पिछाडीवर आहे. 100च्या आता भारताने पहिले 4 विकेट गमावल्यावर रिषभ पंत (Rishabh Pant) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्या शतकी भागीदारीने संघाचा डाव सावरला. पंत आणि पुजाराच्या शतकी भागीदारीमुळे भारतीय संघाने 200 धावांचा पल्ला पार केला आहे. पंतने झटपट फलंदाजी करत धावसंख्येचा वेग वाढवला मात्र तो पुन्हा एकदा नर्व्हस 90चा शिकार झाला आणि अवघ्या 9 धावांनी त्याचं शतक हुकलं. पंतने 44 चेंडूचा सामना करत 9 चौकार आणि 5 षठकाराच्या मदतीने 91 धावांचा पाऊस पाडला. भारतासाठी जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. सामन्यादरम्यान बऱ्याच रेकॉर्डची नोंद झाली जे खालीलप्रमाणे आहेत. (IND vs ENG 1st Test Day 3: रिषभ पंत-चेतेश्वर पुजरा यांच्या अर्धशतकाने टीम इंडियाची गाडी रुळावर, दिवसाखेर 257 धावांवर भारताचा अर्धा संघ तंबूत)
1. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू नील हार्वे आणि आफ्रिकेचा माजी फलंदाज हर्शल गिब्स यांना मागे टाकले आहे. हार्वेने कसोटी क्रिकेटमध्ये 6149 आणि गिब्सने 6167 धावा केल्या आहेत. तर, पुजाराने टेस्ट क्रिकेटमध्ये 6184 धावा केल्या आहेत.
2. पुजाराने आज आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील 29वे अर्धशतक झळकावले तथापि, त्याचे 19वे शतक हुकले.
3. भारतीय गोलंदाजांनी चेन्नई कसोटी सामन्यात 10 वर्षानंतर सर्वाधिक 19 नो-बॉल टाकले जे टेस्ट इतिहासात कोणत्याही संघाच्या गोलंदाजांनी टाकलेले दुसरे सर्वाधिक नो-बॉल ठरले. 2010 कोलंबो कसोटी सामन्यात श्रीलंकेविरूद्ध भारतीय गोलंदाजांनी यापूर्वी 19 नो-बॉल टाकले होते.
4. रिषभ पंतने आज आपल्या शानदार फलंदाजीदरम्यान पाच षटकार आणि नऊ चौकार ठोकले. इंग्लंडविरुद्ध कसोटीमध्ये एका डावात भारतीय फलंदाजाने मारलेले सर्वाधिक षटकार आहेत.
5. पंत आज 88 चेंडूत 91 धावा काढून बाद झाला. पंतच्या कसोटी क्रिकेट कारकीर्दीतील हे पाचवे अर्धशतक होते.
टीम इंडियाकडून पहिल्याकडून रोहित शर्माने 6, शुभमन गिल 29, कर्णधार विराट कोहली 11, तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे एकच धाव करू शकला.