टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st Test: ऑस्ट्रेलिया संघावर कांगारू देशात मात केल्यावर टीम इंडिया (Team India) आता इंग्लंडला (England) टक्कर देण्यासाठी सज्ज होत आहे. 5 फेब्रुवारीपासून चेन्नईच्या (Chennai) एम. ए चिदंबरम स्टेडियमवर पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघ 5 सामन्यांची टी-20 आणि 3 सामन्यांची वनडे मालिकेत आमने-सामने येतील. भारताने ऑस्ट्रेलियाला परदेशात पराभूत केले तर इंग्लंडने श्रीलंकेला त्यांच्या घरीच पराभूत केल्याने दोन्ही संघाचा आत्मविश्वास उंचावला असेल. विराट कोहलीसह अनेक ज्येष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली तर, जो रुटच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघानेही चांगली कामगिरी केली आहे. अशास्थितीत आगामी मालिकेत टीम इंडियाच्या 5 तुफानी खेळ करून क्रिकेटपटूंवर सर्वांची लक्ष लागून असेल ज्यांच्याबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत. (IND vs ENG 1st Test 2021: अजिंक्य रहाणेने कसली कंबर, इंग्लंडविरुद्ध Chennai टेस्टपूर्वी नेट्समधील तुफान बॅटिंगचा Video मिस करू नका)

1. विराट कोहली

भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली पितृत्व राजेंनंतर पुनरागमन करीत आहे. या मालिकेत कोहलीच्या नेतृत्वासह त्याच्या वैयक्तिक कामगिरीवरही त्यांचे लक्ष लागून असेल. 2020 विराटसाठी काही खास ठरले नाही आणि कोहली एकही शतक करू शकलेला नाही. विराटने 2019 नोव्हेंबरमध्ये बांग्लादेशविरुद्ध अखेर शतक ठोकले होते. त्यानंतर कोहली न्यूझीलंड दौर्‍यावर संघर्ष करताना दिसला आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अ‍ॅडलेड सामन्यातही तो मोठा डाव खेळण्यात अपयशी ठरला. मॉडर्न क्रिकेटचे फॅब 4- केन विल्यमसन, स्टिव्ह स्मिथ, जो रूट- यांनी मागील टेस्ट सिरीजमध्ये शतके ठोकली आहेत. अशास्थितीत, कोहलीचे लक्ष इंग्लंडविरुद्ध मोठा डाव खेळण्यावर प्रयत्नशील असेल.

2. रोहित शर्मा

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर रोहित दोन कसोटी सामने खेळला. सिडनी येथे खेळल्या गेलेल्या मालिकेच्या तिसर्‍या सामन्यात रोहितने पहिल्या डावात 26 धावा तर दुसऱ्या डावात 52 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर रोहितने 32.25 च्या सरासरीने 129 धावा केल्या. सलामीच्या सामन्यात शुभमन गिल, मयंक अग्रवाल आणि केएल राहुल हे तीन पर्याय आहेत. अशा परिस्थितीत रोहित इंग्लंडविरुद्ध मोठा डाव खेळण्याच्या प्रयत्नात असेल.

3. शुभमन गिल

मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे सामन्यातून टेस्ट डेब्यू करणाऱ्या शुभमनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्रभावी कामगिरी केली. ब्रिस्बेनच्या निर्णायक सामन्यात त्याने 91 धावांची महत्वपूर्ण डाव खेळला. शुभमनकडून दिग्गजांना मोठ्या अपेक्षा आहेत, अशा परिस्थितीत गिलवर अपेक्षांचे ओझं असेल. इंग्लंडविरुद्ध सलामीच्या सामन्यातही तो भारताला कशी सुरुवात देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गिलसमोर अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जोफ्रा आर्चरसारखे गोलंदाज असणार आहेत.

4. रिषभ पंत

विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतसाठी ऑस्ट्रेलिया दौरा जबरा सिद्ध झाला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला सलग दुसरा विजय मिळवण्यात पंतने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विकेटकिपिंग पंतची कमजोर बाजू आहे. ऑस्ट्रेलियामधील वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याने विकेटच्या मागे अनेक झेल सोडले. अशा परिस्थितीत टर्निंग ट्रॅकवरप्रत्येकजण पंतच्या विकेटकीपिंगवर सर्वांचे लक्ष लागून असेल.

5. रविचंद्रन अश्विन

अश्विन ऑस्ट्रेलियामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या स्टार खेळाडूंपैकी एक होता. अश्विनने सिडनीमध्ये हनुमा विहारीबरोबर खेळलेला डाव बराच काळ लक्षात राहील. अश्विनने 3 सामन्यात 12 विकेट घेतल्या आणि बॅटनेही योगदान दिले. भारतीय संघाचा हा मुख्य फिरकीपटू आता घरोघरी खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. घरच्या मैदानावर अश्विनचा रेकॉर्डही उत्कृष्ट आहे. अश्विनने भारत 43 टेस्ट सामन्यात 254 विकेट घेतल्या ज्यात 21 वेळा डावात त्याने 5 विकेट घेतले आहेत. अश्विनच्या नावावर 4 कसोटी शतकेही आहेत, त्यापैकी 2 त्याने भारतात केली आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यात मालिकेचे पहिले दोन सामने चेन्नईत तर उर्वरित दोन सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळले जाणार आहे. विशेष म्हणजे, तिसरी कसोटी डे नाईट खेळली जाईल.