अजिंक्य रहाणे सराव सत्र (Photo Credit: Instagram)

IND vs ENG 1st Test 2021: ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाचे (Team India) विजयी नेतृत्व केल्यावर जो रूटच्या इंग्लंडचा (England) सामना करण्यासाठी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) परत ट्रेनिंगवर आला आहे. बुधवारी रहाणेने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी प्रशिक्षण सत्रात भाग घेतला आणि चेन्नई (Chennai) येथे पहिल्या टेस्टसाठी तयारी करण्यासाठी गोलंदाज सौरभ कुमार आणि कृष्णप्पा गौथमविरूद्ध नेट्समध्ये घाम गाळला. इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाचे सोमवारी पहिले मैदानी प्रशिक्षण सत्र पार पडले. मैदानी सत्रादरम्यान, कोरोना व्हायरसच्या खेळाडूंच्या तीन RT-PCR टेस्ट नियमित अंतराने घेण्यात आल्या असून सर्व भारतीय खेळाडूंचा अहवाल नकारात्मक आला. यानंतर यजमान संघाने सहा दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीनंतर मंगळवारपासून त्यांचे नेटचे सत्र सुरू झाले. दरम्यान, इंग्लंड खेळाडूंचा कोरोना अहवाल देखील नकारात्मक आला त्यानंतर त्यांनीही सरावाला सुरुवात केली. (ICC World Test Championship Final: टीम इंडियाच्या WTC फायनलच्या मार्गात इंग्लंडचा अडथळा, पहा विराटसेनेसाठी कसे आहे टेस्ट चॅम्पियनशिपचे गणित)

रहाणेने सोशल मीडिया अकाउंटवर फलंदाजीच्या सरावाचा व्हिडिओ शेअर केला ज्यात भारतीय उपकर्णधार बॅकफूट आणि फ्रंटफूट दोन्हीवर शॉट्स खेळताना दिसला. “ट्रेनिंगवर परतलो,” कॅप्शन देत रहाणेने व्हिडिओ शेअर केला. रहाणेने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर काही महत्त्वपूर्ण खेळी खेळत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत मैदानात घेतलेले निर्णय उल्लेखनीय ठरले. मात्र, नियमित कर्णधार पुन्हा राष्ट्रीय संघात पुनरागमन करत असल्याने रहाणेच्या खांद्यावरचा भार कमी होईल आणि आता तो आपल्या बॅटने आणखी प्रभाव पडण्यासाठी प्रयत्नशील असेल. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. कसोटी मालिकेचे पहिले दोन खेळ चेन्नई येथे तिसर्‍या आणि चौथ्या कसोटी सामन्यांसाठी अहमदाबादला रवाना होतील.

दरम्यान, तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे (टीएनसीए) सचिव आर एस रामासामी यांनी मंगळवारी पुष्टी केली की पहिली कसोटी रिक्त स्टेडियममध्ये खेळली जाईल तर दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी चेपॉक स्टेडियमवर 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला पर्वांगानी देण्यात आली आहे.