ICC World Test Championship Final: ऑस्ट्रेलियाने (Australia) दक्षिण आफ्रिकेचा आगामी दौरा स्थगित केला आणि याचा फायदा थेट न्यूझीलंडला (New Zealand) झाला. यंदा क्रिकेटची पांढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) फायनलमध्ये केन विल्यम्सनच्या किवी टीमने धडक मारली आहे आणि आता दुसऱ्या फायनलिस्टसाठी टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) संघात चुरस रंगणार आहे. 5 फेब्रुवारीपासून दोन्ही देशात चार सामन्यांच्या टेस्ट सिरीजला सुरुवात होणार असून विजयी संघ थेट चॅम्पियनशिप फायनल गाठेल. भारतीय संघ गुणतालिकेत विजयी टक्केवारीनुसार आघाडीवर आहे, मात्र इंग्लंडविरुद्ध एक चुकीचे पाऊल त्यांना फायनलच्या शर्यतीतून बाहेर करेल. आगामी मालिकेत विजय मिळवून जून महिन्यात होणाऱ्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी विराटसेनेपुढे जो रूटच्या आक्रमक इंग्लिश संघाचे आव्हान असेल. तथापि आगामी मालिका विजयासाठी भारतीय संघ विजयाचा प्रमुख दावेदार आहे. (ICC World Test Championship Final: न्यूझीलंडला मिळालं फायनलचं तिकीट; भारत आणि इंग्लंड संघात दुसऱ्या स्थानासाठी रेस)
न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र होण्यासाठी यजमान भारताला इंग्लंडविरुद्ध आगामी मालिकेत कमीतकमी दोन सामने जिंकणे गरजेचे आहे, तर ऑस्ट्रेलियाची पात्रता भारत-इंग्लंड संघातील मालिकेच्या निकषावर अवलंबून आहे. तथापि, इंग्लंडविरुद्ध मालिकेत भारताचा 1-0 असा विजय ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामन्यात जाण्याचा मार्ग मोकळा करू शकतो. विराटसेनेला अंतिम सामन्यात टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश करायचे असल्यास चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला कमीतकमी 2-0 ने पराभूत करावे लागेल तर 2-1, 3-0, 3-1 किंवा 4-0 असा विजय संघासाठी अधिक सुरक्षित ठरेल. मात्र, इंग्लंड संघाने 3-0, 3-1, 4-0 अशा फरकाने विजय मिळवल्यास भारतीय संघाचे फायनलमध्ये पोहचण्याचे स्वप्न भंग होईल.
दुसरीकडे, 'विराटसेने'ने 1-0 किंवा 1-0, 2-0, 2-1 अशा फरकाने इंग्लंडने विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियाचा फायनलमध्ये पोहचण्याचा मार्ग प्रशस्त होईल. इतकंच नाही तर मालिकेत 0-0, 1-1 किंवा 2-2 अशी अनिर्णीत राहिल्यास ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना खेळण्यास पात्र ठरेल. अशास्थितीत आगामी मालिका टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.