भारत आणि बांगलादेश ( India VS Bangladesh ) कसोटी सामन्याचे (Test Match) काउंटडाऊन सुरू झाले आहे. दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. हा सामना सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया तब्बल 43 दिवसांनी मैदानात परतणार आहे. बांगलादेशच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा (Team India) सामना श्रीलंकेशी झाला होता, जिथे संघाला शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, शुक्रवारी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) टेस्ट मॅचसाठी चेन्नईला पोहोचले आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी विमानतळावर चाहत्यांची गर्दी झाली होती. (हेही वाचा - IND vs BAN Test Series 2024: रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालची एकाच विक्रमाकडे नजर, बांगलादेशविरुद्ध कोण बनणार 'बादशाह'?)

रोहित शर्मा चेन्नईत दाखल पाहा पोस्ट -

 

विराट कोहली चेन्नईत दाखल पाहा पोस्ट -

 

 

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराझ खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर. जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.