कोलकाताच्या प्रसिद्ध ईडन गार्डन्सवर भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघातील पहिला डे-नाईट कसोटी सामना सुरु आहे. टीम इंडिया आणि बांग्लादेश संघ पहिल्यांदा पिंक बॉलने टेस्ट सामना खेळत आहे. 2015 मध्ये पहिला डे-नाईट टेस्ट सामना खेळला होता, पण टीम इंडियाने आजवर पिंक बॉलने खेळण्यास संकोच व्यक्त केला होता. भारतीय संघाचे बरेच खेळाडू गुलाबी बॉलने यापूर्वी घरगुती सामन्यांमध्ये खेळले आहेत. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने इतिहास रचला आहे. पिंक बॉल टेस्टमध्ये भारतासाठी पहिली विकेट घेणारा इशांत पहिला गोलंदाज बनला. त्याने बांग्लादेशच्या इमरूल कायस याला माघारी पाठवले शिवाय, त्याने बांग्लादेशविरुद्ध मॅचमध्ये 5 विकेट घेतल्या. त्याने 22 धावांवर 5 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 2007 पासून भारतीय भूमीवर इशांतने पहिल्यांदाच डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी बजावली आहे. (IND vs BAN 2nd Test Day 1: विराट कोहली याने टेस्ट क्रिकेट मध्ये रचला इतिहास, 'ही' कामगिरी करणारा बनला पहिला भारतीय, वाचा सविस्तर)
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इशांत पत्रकारांशी बोलला. डे-नाईट टेस्टमध्ये सर्वात मोठा प्रश्न होता की रात्री गुलाबी बॉल पाहण्यास अडचण येते का? याच याविषयी इशांतला प्रश्न विचारण्यात आला की, संध्याकाळी व रात्री गुलाबी रंगाचे गोळे पाहणे कठीण आहे का? यावर इशांतने दिलेले गमतीशीर उत्तर ऐकून तिथे उपस्थित सर्वानाच हसू फुटले. गमतीशीर प्रतिक्रिया देत इशांत म्हणाला, "हो, जर लाईट असेल तर बॉल दिसेल." पाहा इशांतचा हा मजेदार व्हिडिओ:
दरम्यान, डे-नाईट टेस्टमध्ये प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेश संघ 106 धावांवर ऑल आऊट झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या 3 विकेट्स गमावून 174 धावा केल्या होत्या. कर्णधार विराट कोहली याने अर्धशतक पूर्ण केले होते. आता दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे आणि कोहली त्याच्या 27 व्या टेस्ट शतकाच्या जवळ पोहचला आहे, तर टेस्ट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे.