विराट कोहली (Photo Credit: Getty)

भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा आणि शेवटचा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने यापूर्वी कर्णधार म्हणून फलंदाजीची अनेक विक्रम नोंदविली आहेत. कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर बांग्लादेशविरूद्ध डे-नाईट कसोटी सामन्यात फलंदाजी करताना त्याच क्रमवारीत त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. या मॅचमध्ये 32 धावा करत कोहलीने एका खास विक्रमवीर त्याचे नाव लिहिले आहे. पिंक बॉल टेस्टच्या पहिल्या डावात कर्णधार म्हणून विराट 32 धावांचा आकडा गाठल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पाच हजार धावा पूर्ण केल्या. विराटने 53 डावांमध्ये पाच हजार धावा पूर्ण करत सर्वात जलद कामगिरीची नोंद केली आहे.  ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय आणि आशियाई कर्णधार बनला, तर जगातील सहावा क्रिकेपटू बनला. कोलकाता टेस्टआधी विराटने कसोटी क्रिकेटमधील 52 कसोटी सामन्यांच्या 85 डावांमध्ये 4968 धावा केल्या होत्या. विराटच्या अगोदर कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ग्रॅम स्मिथ, एलन बॉर्डर, रिकी पॉन्टिंग, क्लाइव लॉयड आणि स्टीव्ह फ्लेमिंग या कर्णधारांनी पाच हजाराहून अधिक धावांची नोंद केली आहे. शिवाय, विराटच्या आधी कोणताही अशियाई कर्णधार हा टप्पा गाठू शकला नाही. (Spirit Of Cricket! मोहम्मद शमी याचा चेंडू हेल्मेटवर लागल्यावर विराट कोहली ने नईम हसन साठी टीम इंडियाच्या फिजिओची मागवली मदत, पाहा Video)

विराटनंतर भारताच्या कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एमएस धोनी (MS Dhoni) दुसर्‍या क्रमांकावर आहे. धोनीने 60 कसोटी सामन्यात 3454 धावा केल्या. यानंतर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) 47 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून 3449 धावा करत तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंदोर टेस्ट दरम्यान हा विक्रम नोंदवण्याची विराटला संधी होती. पण त्या सामन्यात विराटने एक डाव खेळला आणि त्यातही तो खाते न उघडता बाद झाला. भारताने हा सामना डाव आणि 130 धावांनी जिंकला.

दरम्यान, कोलकातामधील सामन्यात भारताचा वरचष्मा आहे. टॉस जिंकून बांग्लादेशचा कर्णधार मोमिनुल हक याने फलंदाजीचा निर्णय घेतला, पण बांग्लादेशी फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर हतबल दिसले. पहिले फलंदाजी करत बांग्लादेशी संघ 106 धावांवर ऑल आऊट झाला.