Spirit Of Cricket! मोहम्मद शमी याचा चेंडू हेल्मेटवर लागल्यावर विराट कोहली ने नईम हसन साठी टीम इंडियाच्या फिजिओची मागवली मदत, पाहा Video 
(Photo Credit: Twitter/@BCCI)

कोलकाता कसोटीच्या पहिल्याच दिवशी बांग्लादेश (Bangladesh) संघाचा पहिला डाव 30.3 ओव्हर106 धावांवर संपुष्टात आला. मॅचदरम्यान दुसऱ्या सत्रात मोहम्मद शमी (Mohammed Shami) याचा घातक चेंडू बांग्लादेशच्या नईम हसन (Naeem Hasan) याच्या हेल्मेटला लागला आणि त्याला मदत करण्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने भारतीय फिजिओ नितीन पटेल (Nitin Patel) यांना मैदानात बोलावले. कोहलीचा हा जेस्चर पाहून मैदानात आणि टीव्हीवर सामना पाहणारे प्रेक्षक आश्चर्यचकित झाले. बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाउंटवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. याच्यावर चाहत्यांनी विराटच्या या जेस्चरचे कौतुक करत अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ शेअर करत भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) लिहिले, 'शेवटी, सर्व हेच काही आहे #स्पिरिटऑफक्रिकेट." (IND vs BAN 2nd Test Day 1: भारतीय वेगवान गोलंदाजांसमोर बांगलादेश संघ हतबळ, पहिला डाव 106 धावांवर संपुष्टात)

ही घटना शमीच्या 22.1 षटकादरम्यान घडली, जेव्हा नईमच्या हेल्मेटला शमीचा बाउन्सर लागला. यावेळी बांगलादेशी संघाची धावसंख्या 6 बाद 73 अशी होती. हेल्मेटवर चेंडू लागल्यानंतर नईमने हेल्मेट काढला. त्याला अस्वस्थ पाहून दुसऱ्या स्लिपवर फिल्डिंग करत असलेला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या जवळ आला आणि त्याने पॅव्हिलिअनकडे इशारा करत भारतीय फिजिओ बोलावले. यानंतर नितीन पटेल यांनी मैदानात येऊन नईमची तपासणी केली. बांग्लादेशचे फिजिओ थोड्या वेळापूर्वी रिटायर्ड हर्ट झालेल्या लिटन दास याच्यासमवेत असल्यामुळे ते मैदानात येऊ शकले नाही. यापूर्वी, 20.3 षटकांत, शमीचा चेंडू दासच्या हेल्मेटवर आला. त्याने नंतर पुन्हा खेळण्यास सुरुवात केली, पण नंतर अस्वस्थ वाटल्याने त्याने अंपायरअशा बोलणी केली आणि रिटायर्ड हर्ट झाला. त्याच्या जागी मेहदी हसन कन्सशन म्हणून खेळायला आला.

दरम्यान, पहिल्या दिवसाच्या लंचनंतर बांग्लादेशचा संघ पहिल्या डावात 106 धावांवर ऑल आऊट झाला. भारतीय वेगवान गोलंदाजांसमोर बांग्लादेशी फलंदाजी जास्त काळ मैदानात टिकू शकले नाही. बांग्लादेशकडून शादमान इस्लाम याने सर्वाधिक 29 धावा केल्या. दुसरीकडे, भारताकडून इशांत शर्मा याने 5 विकेट घेतल्या.