IND vs BAN 2nd Test Day 1: भारतीय वेगवान गोलंदाजांसमोर बांगलादेश संघ हतबळ, पहिला डाव 106 धावांवर संपुष्टात
टीम इंडिया (Photo Credit: IANS)

ईडन गार्डन्सवर सुरु असलेल्या 2 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बांग्लादेशचा पहिला डाव धावांवर संपुष्टात आला. भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघातील सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर खेळला जात आहे. आजपासून सुरु झालेल्या या मॅचमध्ये टॉस जिंकून बांग्लादेशने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्यांचा तो निर्णय चुकीचा ठरला. दुसऱ्या मॅचमध्ये सुरुवातीला भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. बांग्लादेशचा पहिला डाव 106 धावांवर संपुष्टात आला. बांग्लादेशने पहिल्या डावात 30.3 ओव्हरचा सामना केला. भारताकडून इशांत शर्मा (Ishant Sharma) याने सर्वाधिक 5, उमेश यादव (Umesh Yadav) याने 3 आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने 2 गडी बाद करत बांग्लादेशला बॅकफूटवर टाकले. इशांतने पहिल्यांदा भारतात 5 विकेट घेतल्या आहेत.  शादमान इस्लाम (Shadman Islam) याने बांग्लादेशकडून सर्वाधिक 29 धावा केल्या. लंचच्या आधी शमीचा चेंडू लिटन दास याच्या डोक्याला लागल्याने रिटायर्ड हर्ट झाला. अर्धा बांग्लादेशी संघ माघारी परतल्यावर दास फलंदाजीसाठी आला. त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या, पण शमीचा चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला. त्याने नंतर फलंदाजी केली, पण तो असहज दिसला आणि अखेरीस 24 धावांवर रिटायर्ड हर्ट होत पॅव्हिलिअनमध्ये परतला. (IND vs BAN 2nd Test Day 1: रोहित शर्मा याने स्लिपमध्ये पकडलेला सुपरमॅन कॅच पाहून विराट कोहली याने दिली अशी प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ)

कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणार सामना हा पिंक बॉलने खेळला जात आहे. दोन्ही संघ पहिल्यांदा गुलाबी चेंडूने टेस्ट सामना खेळला जात आहे. बांग्लादेशी संघ भारतीय वेगवान गोलंदाजांच्या त्रिमूर्तीसमोर संघर्ष करताना दिसला. एकेवेळी संघ शंभर धावादेखील करतील की नाही याबाबत संशय होता. पण, नईम हसन आणि मेहदी हसन यांनी सावध खेळ करत संघाला शंभरीच्या जवळ नेले. शमीने मेहदीला बाद 98 धावांवर बांग्लादेशच्या आठव्या फलंदाजाला माघारी धाडले.

या ऐतिहासिक सामन्यातसाठी भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. दुसरीकडे, बांग्लादेशने दोन बदल करत अल-अमीन हुसेन आणि नईम हुसेन यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.