(Photo Credit: Twitter)

भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यातील पहिल्या डे-नाईट टेस्टमध्ये टॉस जिंकून कर्णधार मोमिनुल हक (Mominul Haque) याने पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिले फलंदाजी करत बांग्लादेशच्या अडचणीत वाढ झाली आहे. फक्त 26 धावांवर बांग्लादेशने त्यांचे चार गडी गमावले आहेत. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीपासून आपापले वर्चस्व कायम ठेवले. इशांत शर्मा, उमेश यादव (Umesh Yadav) आणि मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यास बांग्लादेशी फलंदाज पहिल्या सत्रात अपयशी दिसले. उमेशने 2 तर शमी आणि इशांतने प्रत्येकी 1 गडी बाद करत बांग्लादेशला लागोपाठ मोठे धक्के दिले. बांग्लादेशचे तीन फलंदाज शून्यावर माघारी परतले. यादरम्यान बांग्लादेशचा कर्णधार मोमिनुलला पॅव्हिलिअनमध्ये पाठवण्यासाठी टीम ओनिडाचा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने दुसऱ्या स्लिपमध्ये शानदार असा एक हाती झेल पकडला. रोहितने पकडलेल्या अप्रतिम झेल पाहून कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हादेखील स्वतःला थांबवू शकला नाही आणि त्याच्या झेलवर पाहण्यासारखी प्रतिक्रिया दिली. (IND vs BAN 2nd Test Day 1: भारतीय गोलंदाजांचा कहर, Lunch पर्यंत बांग्लादेशने 76 धावांवर गमावले 6 विकेट)

10 व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर उमेशने कर्णधार मोमिनूलला एकही धाव करून न देता माघारी धाडले. यात रोहितने पकडलेला झेल चर्चेचा विषय बनला. दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहितने हवेत मोठी उडी मारत मोमिनूलला बाद केले. हा कॅच खरतर विराटचा होता, पण रोहितने अगदी मोक्याच्या क्षणी हवेत उडी घेत कॅच पकडला. रोहितच्या या कॅचचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्हीही पाहा: 

यापूर्वी झालेल्या इंदोर सामन्यात टीम इंडियाने बांग्लादेशचा डाव आणि 130 धावांनी प्रभाव करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता कोलकाता सामना जिंकत टीम इंडिया 2 सामन्यांच्या मालिकेत क्लीन-स्वीप करण्याच्या निर्धारित असेल.