IND vs BAN 2nd Test Day 1: भारतीय गोलंदाजांचा कहर, Lunch पर्यंत बांग्लादेशने 76 धावांवर गमावले 6 विकेट
उमेश यादव आणि इशांत शर्मा (Photo Credits: Twitter/BCCI)

भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये दुसरा टेस्ट सामना खेळला जात आहे. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत बांग्लादेशने लंचपर्यंत 73 धावांवर 6 विकेट गमावले आहेत. भारतीय वेगवान गोलंदाजांची त्रिमूर्ती इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांनी बांग्लादेश फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. लंचपर्यंत उमेशने 3, इशांतने 2 आणि शमीने 1 गडी बाद करत दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी बांग्लादेशच्या अडचणीत वाढ केली आहे. बांग्लादेशकडून शादमान इस्लाम (Shadman Islam) याने 29 धावा केल्या. लंचच्या आधी बांग्लादेशला मोठा झटका बसला. शमीच्या घातक बाऊन्सरमुळे लिटान दास (Liton Das) निवृत्त झाला आहे. 21 व्या षटकातील तिसर्‍या चेंडूवर शमीचा चेंडू लिटनच्या हेल्मेटवर लागला. फिजिओने त्याची तपासणी केली आणि त्यानंतर त्याने खेळण्यास सुरवात केली, परंतु इशांतच्या षटकानंतरच त्याची अस्वस्थता गंभीर झाल्याचे दिसली आणि त्याने हेल्मेट काढून अंपायर विल्सनशी बोलाणी केली. ज्यानंतर तो निवृत्त झाला. याचवेळी अंपायरने लंच ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांचा हा पहिला डे नाईट टेस्ट सामना आहे. यापूर्वी दोन्ही संघ गुलाबी बॉलने कधीही खेळले नाहीत. 15 ओव्हरच्या आतच बांगलादेशचा जवळ जवळ अर्धा संघ माघारी परतला आहे. बांग्लादेशच्या फलंदाजांनी अडखळत सुरुवात केली. (IND vs BAN 2nd Test Day 1: रिद्धिमान साहा याच्याकडून खास विक्रमाची नोंद; एमएस धोनी याच्यासह 'या' यादीत झाला समवेश)

बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेचा दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना जिंकूनभारतीय संघ ऐतिहासिक डे नाईट सामन्याला संस्मरणीय बनवायचा प्रयत्न करेल. इशांतने इमरूल कायस याला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याच्यानंतर 10 व्या ओव्हरमध्ये उमेशने मोमिनुल आणि मोहम्मद मिथुन यांना बाद करत बांग्लादेशच्या अडचणीत वाढ केली. आजपासून सुरु झालेल्या सामन्यासाठी टीम इंडियाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हन एकही बदल नाही केला. दुसरीकडे, बांग्लादेशने दोन बदल केले आहेत.

यापूर्वी, इंदौर कसोटीत सामन्यात भारताने डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला आणि आता दुसरा सामन्यात विजयासह टीम इंडिया क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल. क्लीन स्वीपसह भारताला पहिला ऐतिहासिक डे-नाईट कसोटी सामना जिंकण्याची संधी असेल.