विराट कोहली, चेतेश्वर पुजारा (Photo Credit: IANS)

भारत (India)-बांग्लादेश (Bangladesh) यांच्यातील पहिल्या डे-नाईट कसोटी सामन्यात बांग्लादेशचा कर्णधार मोमीनुल हक याने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. बांग्लादेशचा हा निर्णय संघासाठी चुकीचा ठरला आणि पहिल्या डावात बांग्लादेश 106 धावांवर ऑल आऊट झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 3 विकेट गमावून 174 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) 59 नाबाद आणि टेस्ट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) नाबाद 23 धावांवर खेळत होते. पहिल्या दिवसाखेर टीम इंडियाने बांग्लादेशवर पहिल्या डावात 68 धावांची आघाडी घेतली आहे.  दिवसाचा खेळ संपण्याआधी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याने अर्धशतक केले आणि 55 धावांवर बाद झाला. या सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हन कोणताही बदल नाही केला. तर बांग्लादेशने दोन बदल केले. यापूर्वी, भारताविरुद्ध पहिल्या गुलाबी कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांसमोर बांग्लादेश संघ पूर्णपणे हतबल झालेला दिसला. त्यांनी सावध सुरुवात केली, पण नंतर त्यांचे फलंदाज संघर्ष करताना दिसले. बांग्लादेशचे तीन फलंदाज भोपळाही फोडू शकले नाही. कर्णधार मोमिनुल हक, मोहम्मद मिथुन आणि मुशफिकुर रहीम हे तिन्ही फलंदाज शून्यावर माघारी परतले. भारतासाठी इशांत शर्मा याने 5, उमेश यादव याने  3 आणि मोहम्मद शमी याने 2 गडी बाद केले. (IND vs BAN 2nd Test: विराट कोहली याने ईडन टेस्ट क्रिकेट मध्ये रचला इतिहास, 'ही' कामगिरी करणारा बनला पहिला भारतीय, वाचा सविस्तर)

पहिल्या डावांत भारताची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या टेस्ट सामन्यात दुहेरी शतक करणारा मयंक अग्रवाल 14 धावांवर अल अमीन हुसेन याचा शिकार बनला. मयंक मेहदी हसन याच्या हाती झेलबाद झाला. त्यानंतर टी-ब्रेकनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) हादेखील काही प्रभाव पडू शकला नाही आणि 21 धावांवर इबादत हुसेन याने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्यानंतर कोहली आणि पुजाराने संघाचा डाव सावरला. दोंघांनी 94 धावांची भागीदारी रचली. बांग्लादेशकडून इबादत हुसेन याने 2 अल-अमीनने 1 गडी बाद केला होता.

बांग्लादेशकडून शादमान इस्लाम (Shadman Islam) याने सर्वाधिक 29 धावा केल्या. लिटन दास याला मोहम्मद शमी याचा (Mohammed Shami) बाउन्सर हेल्मेटला लागल्याने तो 24 धावांवर असताना रिटायर्ड हर्ट होत परतला. बांग्लादेशकडून पहिल्यांदा एकूण 12 खेळाडूंनी फलंदाजी केली. दास रिटायर्ड हर्ट झाल्याने त्याच्या जागी मेहदी हसन (Mehidy Hasan) कन्क्शन म्हणून आला, तर नईम हसन (Naeem Hasan) यालाही शमीचा वेगवान चेंडू लागल्यावर तैजुल इस्लाम (Taijul Islam) फलंदाजीला आला. यानंतर कन्क्शन म्हणूनपहिल्यांदा दोन खेळाडू मैदानात आले.  बांग्लादेशविरुद्ध दुसरा अंतिम सामना जिंकत भारतीय संघ पहिल्या डे-नाईट टेस्टला संस्मरणीय बनवण्याच्या निर्धारित असेल. कोलकातामध्ये पहिल्यांदा भारतीय संघ गुलाबी बॉलए कसोटी सामना खेळत आहे. बांग्लादेशविरुद्ध दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने डाव आणि 130 धावांनी जिंकला होता. त्यामुळे, दुसरा सामना जिंकत टीम इंडिया दोन सामन्यांच्या मालिकेत क्लीन-स्वीप करण्याचा प्रयत्न करतील.