IND vs BAN 2nd Pink Ball Test: विराट कोहली याचा करिष्मा, तोडला कर्णधार रिकी पॉन्टिंग याचा शतकांचा रेकॉर्ड
विराट कोहली (Photo Credit: IANS)

कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर बांग्लादेश (Bangladesh) विरूद्ध डे-नाईट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने मोठे यश संपादन केले आहे. 'रन मशीन' कोहलीने बांग्लादेशविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये शानदार शतक ठोकले आहे. बांग्लादेशविरुद्ध हे शतक कर्णधार म्हणून 20 वे तर एकूण 27 वे टेस्ट शतक आहे. विराटने 159 चेंडूत हे शतक केले आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) याला पिछाडीवर टाकले. आणि दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.  या मॅचपूर्वी विराटने पॉन्टिंगची बरोबरी करत कर्णधार म्हणून 19 टेस्ट शतकं केली होती. त्यामुळे, या शतकी खेळीसह विराटने आता पॉन्टिंगला मागे टाकले आहे. कर्णधारच्या रूपात सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ (Graeme Smith) याच्या नावावर आहे. स्मिथने 109 सामन्यात 25 टेस्ट शतकं केली आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या आफ्रिकेचा माजी खेळाडू स्मिथने 2003-2013 पासून संघाचे जवळपास 10 वर्षे नेतृत्व केले. क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या आफ्रिकेचा माजी खेळाडू स्मिथने 2003-2013 पासून संघाचे जवळपास 10 वर्षे नेतृत्व केले आहे. यादरम्यान त्याने 25 कसोटी सामन्यात 25 शतके ठोकली आहे.  (IND vs BAN 2nd Day/Night Test: संध्याकाळी पिंक बॉल दिसतो का? ईशांत शर्मा याने मजेदार उत्तर ऐकून तुम्हालाही फुटेल हसू, पाहा Video)

भारताकडून पिंक बॉलने टेस्ट शतक करणारा विराट पहिला फलंदाज बनला आहे. शिवाय, विराटचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 70 शतक आहे. कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 27 आणि वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 43 शतकं ठोकली आहेत. यापूर्वी, सामन्याच्या पहिल्या दिवशी  कोहलीने 32 धावा पूर्ण केल्यावर कसोटी कर्णधार म्हणून 5,000 धावा पूर्ण केल्या. कोहली असं करणारा पहिला भारतीय आणि जगातील सहावा कर्णधार ठरला. यादरम्यान, कोहलीने रिकी पॉन्टिंगच्या विक्रमला मागे टाकले. पॉन्टिंगने 54 सामन्यांच्या 94 डावात ही कामगिरी बजावली होती, तर कोहलीने 53 व्या कसोटी सामन्याच्या 86 व्या डावात पाच हजार धावांचा टप्पा गाठला. या यादीमध्ये वेस्ट इंडीजचे महान कर्णधार क्लाईव्ह लॉयड तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी 106 डावात पाच हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

बांग्लादेशविरुद्ध सध्या सुरु असलेल्या सामन्यात विराटला पहिल्या मॅचमध्ये चांगले प्रदर्शन करता आले नव्हते. पहिल्या सामन्यात विराटने 2 चेंडूंचा सामना केला आणि शून्यावर बाद झाला. दुसऱ्या मॅचमध्ये टीम इंडियाने बांग्लादेशला 106 धावांवर ऑल आऊट केले. इशांत शर्मा याने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या.