IND vs BAN 2019: बांग्लादेश क्रिकेटपटूंच्या संपावर BCCI चे भावी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केले 'हे' विधान, वाचा सविस्तर
सौरव गांगुली, बांग्लादेश संघ (Photo Credit: IANS/Getty)

भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघात 3 नोव्हेंबरपासून 3 सामन्यांची टी-20 मालिका आणि 2 सामन्याची टेस्ट मालिका खेळली जाणार आहे. पण, सध्या याबद्दल सध्या कोंडी निर्माण झाली आणि यामागील कारण म्हणजे, बांग्लादेशी खेळाडूंनी बोर्डाशी वाद असल्याकारणाने संपावर जाण्याच्या निर्णय घेतला असल्याने झाले आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्ड ज्या प्रकारे देशाचे क्रिकेट हाताळत आहे, ते योग्य नाही, असे शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याच्या नेतृत्वाखालील संघातील वरिष्ठ खेळाडूंनी म्हटले आहे. या क्रिकेटपटूनि जाहीर केले आहे की जोवर त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तेव्हा तोवर संघ कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सहभाग घेणार नाही. आणि यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) भावी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना विचारले असता त्यांनी स्पष्टपणे उत्तर देण्याचे टाळले. पण, बांग्लादेश त्याचा हा वाद लवकर संपवण्याचा प्रयत्न करतील यावर विश्वास व्यक केला. (IND vs BAN 2019: बांग्लादेश क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्यावर संकट, शाकिब अल हसन याच्यासह अन्य खेळाडू घेऊ शकतात माघार)

गांगुली एएनआयशी बोलताना म्हणाले की, "हे प्रकरण बांग्लादेशच्या क्रिकेटपटूंचे आहे. तथापि, हा प्रश्न सुटेल आणि बांगलादेश संघ भारत दौर्‍यावर येईल," अशी आशा गांगुलीने व्यक्त केली. शिवाय, या दौऱ्याबद्दल बोलताना गांगुली यांनी सांगितले की, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी कोलकातामध्ये होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट मालिकेसाठी हजार होण्याची संमती दर्शवली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही ते आमंत्रण देणार असल्याचे गांगुलीने सांगितले.

बांग्लादेश संघाचा भारत दौरा 3 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे आणि त्याअंतर्गत पहिले तीन टी-20 मॅच खेळले जाईल. यांच्यानंतर यानंतर दोन्ही देशांत दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु होईल. 14 नोव्हेंबरपासून सुरू होणारी ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा एक भाग असेल. टीम इंडिया सध्या आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत 240  गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.