बांग्लादेश (Bangladesh) क्रिकेट संघ पुढील महिन्यांपासून भारत (India) दौऱ्यावर येणार आहे. यादरम्यान, भारत आणि बांग्लादेश 3 मॅचची टी-20 मालिका आणि 2 सामन्यांचे टेस्ट सामने खेळणार आहे. पण, या दौऱ्यापूर्वी बांग्लादेश क्रिकेटमध्ये काही बिनसल्याचे वृत्त समोर येत आहे. संघाच्या प्रमुख खेळाडूंनी आज पत्रकार परिषद बोलावली आहे. बांग्लादेश क्रिकेटमधील सर्व मोठ्या खेळाडूंची उपस्थिती अपेक्षित आहे. देशातील क्रिकेटची स्थिती सुधारण्याची मागणी खेळाडू करत असलेले बांग्लादेशचे अव्वल क्रिकेटपटू आजपासून संपावर जाणार आहे. देशाचा स्टार खेळाडू शाकिब अल हसन याने यापूर्वी सांगितले होते की, त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत तो क्रिकेट खेळणार नाही. भारतविरुद्ध टी-20 मालिका 3 नोव्हेंबरपासून आणि 14 नोव्हेंबरला कसोटीला सुरुवात होणार आहे आणि बहिष्कारामुळे बांग्लादेशच्या नॅशनल क्रिकेट लीगवर याचा परिणाम होईल. अद्याप ही लीग खेळली जात आहे. (IND vs BAN T20I 2019 : टी-20 मालिकेसाठी बांग्लादेश संघाची घोषणा, बंदी घातलेल्या 'या' खेळाडूचे 3 वर्षानंतर संघात पुनरागमन)
शिवाय, पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या भारतीय मोहिमेवरही संकट बनले आहे. देशाचे क्रिकेटपटू आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्ड (BCB) यांच्यात वाद सुरु आहे. हा वाद मुख्यतः बांग्लादेश प्रीमियर लीगचा आहे. बोर्डाने मागील महिन्यात बांगलादेश प्रीमियर लीगमधून, बीपीएल फ्रेंचाइजी मॉडेल काढण्याचा निर्णय घेतला गेला होता. यासह बांग्लादेशच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या मॅच फीमध्ये वाढ केलेली नाही ज्यामुळे खेळाडूंमध्ये संताप आहे. बीपीएलमध्ये सॅलरी कॅपमुळेदेखील खेळाडू आहे.
बांग्लादेशी बोर्डाने नुकताच निर्णय घेतला होता की बीपीएलमध्ये प्रत्येक संघात किमान एक लेग स्पिनर असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी संघाच्या दोन मुख्य प्रशिक्षकांनाही निलंबित केले आहे.