टीम इंडियाविरुद्ध 3 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी बांग्लादेश संघाची घोषणा करण्यात आली आहे. बांग्लादेश (Bangladesh) क्रिकेट बोर्डाने 15-सदस्यीय संघाची घोषणा केली असून या संघाची धुरा अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याच्याकडे सोपविण्यात अली आहे. भारत (India) आणि बांग्लादेश संघात नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान 3 टी-30 आणि 2 टेस्ट मालिका खेळण्यात येणार आहे. दोन्ही संघातील पहिली मॅच 3 नोव्हेंबरला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळली जाईल. दुसरा सामना राजकोटमध्ये 7 नोव्हेंबरला आणि तिसरा टी-20 सामना 10 नोव्हेंबरला नागपुरात खेळला जाणार आहे. बांग्लादेश संघाबद्दल बोलले तर अराफत सनी (Arafat Sunny) आणि अल अमीन हुसेन (Al-Amin Hossain) यांचे संघात पुनरागमन झाले आहेत. सनी आणि हुसेनने 2016 मध्ये शेवटचा टी-20 सामना खेळला होता. सनीने दहा टी -20 सामन्यांत 12 विकेट घेतले आहेत. आयसीसी टी-20 विश्वचषकदरम्यान त्याच्या गोलंदाजीच्या संशयामुळे त्याला निलंबित करण्यात आले होते. कौटुंबिक वादामुळे त्याला 2017 मध्ये दोन महिने तुरूंगवासही मिळाला होता.
याशिवाय, सलामीवीर तमीम इक्बाल यानेही संघात पुनरागमन केले आहे. तर, निवड समितीने शब्बीर रहमान, नजमुल हुसेन शान्तो, रुबेल हुसेन आणि तैझुल इस्लाम यांना वगळले आहे. हे सर्व खेळाडू यापूर्वी तिरंगी मालिका खेळले होते. भारत-बांगलादेश हा संघर्ष अखेरचा टी-20 सामना निदाहास ट्रॉफीमध्ये झाला होता. या रोमांचकारी सामन्यात भारतीय संघाने बांग्लादेशचा शेवटच्या चेंडूवर पराभव केला होता.
Bangladesh 15-man squad for the T20I series against India.#BANvInd #T20I pic.twitter.com/Sy5gAY2D1r
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 17, 2019
असा आहे बांग्लादेश संघ: शाकिब अल हसन (कॅप्टन), तमिम इक्बाल, लिटन दास, सौम्य सरकार, नईम शेख, मुश्फिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, असीफ हुसेन, मुसद्दक हुसेन, अमीनुल इस्लाम, अराफत सनी, मोहम्मद सैफुद्दीन, अल अमीन हुसेन, मुस्तफिजुर इस्लाम, आणि शफीउल इस्लाम.