मयंक अग्रवाल (Photo Credit: Getty Images)

IND vs AUS 2nd Test Match 2020-21: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbourne Cricket Ground) दुसरा बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) मॅच खेळली जात आहे. उपकर्णधार अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करत आहे. कांगारू संघाविरुद्ध या सामन्यात टीम इंडियाने शुभमन गिल (Shubman Gill) आणि मोहम्मद सिराज यांना कसोटी पदार्पणची संधी दिली आहे. आणि दोन्ही खेळाडूंनी बॅट व बॉलने प्रभावी कामगिरी बजावली. सिराजने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या दोन धाकड फलंदाजांना माघारी धाडलं तर शुभमनने सलामीला येत 65 चेंडूत 45 धावा केल्या. गिलने त्याच्या शानदार खेळीत आठ चौकार ठोकले. ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर यजमान संघाच्या गोलंदाजांविरुध्द धावा करणे खूप संघर्षमय होते आणि जेव्हा एखादा खेळाडू येथे आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीचा पहिला कसोटी सामना खेळत असतो तेव्हा तो अधिक महत्वाचा ठरतो. शुभमन वगळता मागील काही वर्षात दोन खेळाडूंनी बॉक्सिंग डे सामन्यातून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण करत एक शानदार डाव खेळला आहे. (IND vs AUS 2nd Test 2020: अजिंक्य रहाणेचे ऑस्ट्रेलियात डंका, MCG मध्ये सचिन तेंडुलकर 'हा' पराक्रम करणारा बनला दुसरा भारतीय कर्णधार)

आज आपण या लेखात अशाच तीन खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पणात सर्वात मोठा डाव खेळला आहे. या यादीत एका भारतीय ओपनरने पहिले स्थान पटकावले आहे.

मयंक अग्रवाल

भारतीय संघाचा विद्यमान प्रतिभावान सलामी फलंदाज मयंकने ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्या कसोटी कारकिर्दीचा पहिला सामना खेळला. 2018 मध्ये टीम इंडियाकडून कसोटी सामन्यात पदार्पण करताना मयंकने मेलबर्नमध्ये 76 धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली होती. अग्रवालने देशासाठी 19 डावांमध्ये 1000 सामने खेळले असून सध्या ते कसोटी क्रिकेटमध्ये 12 सामने खेळत आहेत. या दरम्यान त्याने 3 शतक, 4 अर्धशतक केले आहेत. मयंकने बांगलादेशविरुद्ध कसोटीतील सर्वोत्तम 243 धावा केल्या आहेत.

दत्तू फडकर

टीम इंडियाचे माजी अष्टपैलू दत्तू फडकरने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी कारकीर्दीची सुरुवात केवळ 22 वर्षांची असताना केली. 1947 मध्ये सिडनी क्रिकेट ग्राउंडवर कसोटी पदार्पण करत त्यांनी 51 धावा केल्या. भारतासाठी 31 सामने खेळत फडकर यांनी 45 डावांमध्ये 1229 धावा केल्या आहेत. याशिवाय, त्यांनी 31 सामन्यांच्या 48 डावात 62 विकेट घेतल्या आहेत. फडकर यांचे 17 मार्च 1985 रोजी निधन झाले.

शुभमन गिल

या यादीतील तिसरे नाव युवा भारतीय सलामीवीर शुभमन गिलचे आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात गिलने टेस्ट डेब्यू करत 45 धावांचा डाव खेळला आणि संघाला चांगली सुरुवात दिली. लक्षात घेण्यासारखे म्हणजे, शुभमनने कसोटी क्रिकेटपूर्वी भारतीय संघासाठी तीन वनडे सामने सामन्यात 16.3 च्या सरासरीने 49 धावा केल्या आहेत.