IND vs AUS, ICC Cricket World Cup 2019: ऑस्ट्रेलिया वर टीम इंडिया ची 36 धावांनी विजय; शिखर धवन ठरला 'मॅन ऑफ द मॅच'
Team India (Photo Credits: Getty Images)

दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्यानंतर भारताने आज ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 253 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र त्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाची दमछाक झाली. ऑस्ट्रेलिया संघ 316 वर ऑलआऊट झाली. भारताने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सलग दुसरा विजय मिळवला आहे. या सामन्यात शिखर धवन (Shikhar Dhawan)  'मॅन ऑफ द मॅच' ठरला आहे. त्याने 117 धावा केल्या. तर वर्ल्डकपमध्ये आज शिखरने तिसरं शतक ठोकलं आहे.  रोहित शर्मा याने मोडला सचिन तेंडुलकर याचा 'हा' विक्रम 

ANI Tweet

जसप्रीत बुमराह, युजवेंद्र  चहल आणि भुवनेश्वर कुमार भारतीय गोलंदाजांची कमाल या विजयामध्ये महत्त्वाची ठरली. यासोबत विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन या फलंदाजांच्या दमदार खेळीने भारताला विजय मिळवणं सोप्पं गेलं.

ऑस्ट्रेलियावर 1983, 1987,2011 नंतर आज 2019 मध्ये चौथ्यांदा वर्ल्डकपमध्ये भारताने विजय मिळवला आहे.