आज लंडनच्या (London) ओव्हल ग्राऊंडवर (Oval Cricket Ground) भारत (India) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) सामना रंगत आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा फलंदाजीसाठी मैदानात उतरले. या सामन्याच्या सुरुवातीलाच हिटमॅन रोहित शर्माने एक विक्रम रचला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सामन्यात 2000 धावा करणारा रोहित चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी भारताच्या सचिन तेंडुलकरने हा विक्रम केला होता. त्यानंतर या यादीत वेस्टइंडिजच्या विवियन रिचर्ड्स आणि डेस्मंड यांचीही नावे आहेत.
मात्र रोहित शर्माने या तिघांचाही विक्रम मोडत ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वात जलद 2000 धावा करणारा क्रिकेटर ठरला आहे. रोहित शर्माने हा विक्रम 37 सामन्यात केला तर सचिनला हा विक्रम करण्यासाठी 51 सामने खेळावे लागले होते. तर वेस्ट इंडिजच्या विवियन रिचर्ड्स आणि डेस्मंड यांनी अनुक्रमे 45 आणि 59 सामन्यात हा विक्रम केला होता. (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर)
रोहित शर्माने वर्ल्डकपची सुरुवात दमदार केली आहे. दक्षिण ऑफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात नाबाद शतक करत त्याने भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.