टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs AUS 4th Test Day 4: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (India) यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने चौथ्या सामन्याच्या चौथ्या दिवसातील टी ब्रेक पर्यंत  7 विकेट्स गमावून  243 धावा केल्या असून 276 धावांची मोठी आघाडी घेतली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे वेळेपूर्वी टी ब्रेक घेण्यात आला. गब्बाची (Gabba) विकेट पाहता आता कोणतेही गोल करणे खूप कठीण होईल. 1951मध्ये चौथ्या डावात 236  धावा करत वेस्ट इंडिजने विजय मिळवला होता. चहाच्या वेळी पॅट कमिन्स दोन आणि मिशेल स्टार्क एक धाव करून खेळत होते. भारतीय गोलंदाजांनी टी ब्रेकपर्यंत शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या धाकड फलंदाजांना माघारी धाडलं. स्टिव्ह स्मिथने 74 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने 55 धावा केल्या, तर डेविड वॉर्नर 48 धावा करून माघारी परतला. मार्कस हॅरिस 38 आणि मार्नस लाबूशेन 25 धावा करून तंबूत परतला. (IND vs AUS 4th Test 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माचा ‘पंच’, क्रिस श्रीकांत यांच्या डाऊन अंडर कामगिरीची बरोबरी करत मिळवला मोठा बहुमान)

यापूर्वी, पहिल्या सत्रात सिराजने 31व्या ओव्हरमधील तिसर्‍या बॉलवर लाबूशेन आणि शेवटच्या चेंडूवर मॅथ्यू वेडला बाद करत कांगारू संघाला दुहेरी दणका दिला. दुसर्‍या स्लिपमध्ये लाबूशेनने रोहित शर्माकडे झेलबाद झाला आणि रिषभ पंतने विकेटच्या मागे वेडचा आकर्षक झेल पकडला. सिराजने 15 षटकांत 42 धावा देऊन तीन बळी घेतले आहेत. सिराजने 15 ओव्हरमध्ये 42 धावा देऊन तीन विकेट घेतल्या आहेत. शार्दुल ठाकूरनेही 16 ओव्हरमध्ये 49 धावा देऊन तीन गडी बाद केले. दुसर्‍या सत्रात त्याने कर्णधार टिम पेनला 27 धावांवर विकेटकीपर पंतच्या हाती कॅच आऊट केलं आणि कॅमरून ग्रीनला 37 धावांवर रोहित शर्माच्या हाती आऊट केलं. तत्पूर्वी डेविड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस यांनी पहिल्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली. वॉर्नरने 75 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 48 धावा केल्या पण वॉशिंग्टन सुंदरने त्याला एलबीडब्ल्यू करत माघारी धाडलं. त्यापूर्वी हॅरिस 82 चेंडूत 38 धावा करून शार्दूल ठाकूरचा शिकार बनला.

ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबूशेनच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 369 धावांचा डोंगर उभारला, मात्र टीम इंडियाने जबरदस्त पुनरागमन करत त्रिशतकी धावसंख्या गाठत 336 धावांपर्यंत मजल मारली. टीम इंडियासाठी पहिल्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करणाऱ्या शार्दूलने सर्वाधिक 67 तर वॉशिंग्टन सुंदरने 62 धावा केल्या.