वॉशिंग्टन सुंदरचा 'no-look' षटकार (Photo Credit: Twitter/cricket.com.au)

IND vs AUS 4th Test Day 3: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) टेस्ट डेब्यू सामन्यात भारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) फलंदाजी करत करिष्माई कामगिरी करत पहिले अर्धशतक ठोकले. इतकंच नाही तर 100वा टेस्ट सामना खेळणाऱ्या नॅथन लायनच्या (Nathan Lyon) चेंडूवर न पहाता मोठा षटकार खेचला. नेट गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियात रहाण्यास सांगितल्याचा वॉशिंग्टन सुंदरला अखेर प्रतिक्षेचे फळ मिळाले आणि त्याला ब्रिस्बेनच्या गब्बा येथील चौथ्या कसोटी सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. सुंदर त्याच्या कारकिर्दीची पहिला कसोटी खेळत असला तरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन कसोटीच्या (Brisbane Test) तिसऱ्या दिवशी निर्णायक भूमिका बजावली. भारताने 186 धावांवर 6 विकेट गमावले असताना सुंदर आणि शार्दूल ठाकूरच्या (Shardul Thakur) 123 धावांच्या शतकी भागीदारीने संघाला सामन्यात कमबॅक करून दिलं. ठाकूर आणि सुंदरने पहिल्यांदा कसोटी सामन्यात फलंदाजी करत अर्धशतक ठोकले व संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. या दोंघांना वगळता अन्य फलंदाज पन्नाशी धावसंख्या पार करू शकले नाही. (IND vs AUS 4th Test Day 3: ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात आश्वासक सुरुवात, तिसऱ्या दिवसाखेर टीम इंडियावर घेतली 54 धावांची आघाडी)

जेव्हा ठाकूर बाद झाला, तेव्हा सुंदर अधिक आक्रमक झाला आणि लायनच्या चेंडूवर चकित करत 'नो-लुक सिक्स' खेचला. 104व्या ओव्हरमध्ये एक धाव घेण्यात अपयशी ठरल्यावर 54 धावांवर फलंदाजी करणाऱ्या सुंदरने हात मोकळा केला आणि लायनला उत्तुंग षटकार मारला. खेळपट्टीवर उन्हामुळे सुंदरला चेंडूकडे बघण्यात त्रास होत होताना स्पष्ट दिसत होते परिमाणी लायनने टाकलेल्या चेंडूकडे न पाहता खात्रीपूर्वक शॉट खेळला आणि तो सीमारेषेपार गेला. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या बिग बॅश लीगमध्ये आंद्रे फ्लेचरने मारलेल्या ‘नो-लुक’ सारखा असल्याचं यूजर्सकडून म्हटले जात आहे. पहा व्हिडिओ:

ठाकूरला 67 धावांवर पॅट कमिन्सने माघारी धाडलं. 1947 नंतर ठाकूर आणि सुंदरच्या जोडीने टेस्ट सामन्यातील एका डावात तीन विकेट आणि अर्धशतक झळकावले करण्याचा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात टी नटराजननेही तीन गडी बाद केले, आणि यजमान संघ पहिल्या डावात 369 धावांपर्यंत मजल मारू शकला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टिकवण्यासाठी भारताला विजय किंवा ड्रॉची गरज आहे. चार सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे.