IND vs AUS 4th Test Day 3: ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात आश्वासक सुरुवात, तिसऱ्या दिवसाखेर टीम इंडियावर घेतली 54 धावांची आघाडी

टीम इंडियाला ब्रिस्बेनच्या टेस्टच्या पहिल्या डावात 336 धावांवर गुंडाळत ऑस्ट्रेलियाने दुसर्याने दुसऱ्या डावात आश्वासक सुरुवात केली आहे. तिसऱ्या दिवसाखेर यजमान संघाने एकही विकेट न गमावता 21 धावा केल्या आणि 54 धावांची आघाडी घेतली आहे.

IND vs AUS 4th Test Day 3: ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात आश्वासक सुरुवात, तिसऱ्या दिवसाखेर टीम इंडियावर घेतली 54 धावांची आघाडी
टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs AUS 4th Test Day 3: टीम इंडियाला (Team India) ब्रिस्बेनच्या टेस्टच्या (Brisbane Test) पहिल्या डावात 336 धावांवर गुंडाळत ऑस्ट्रेलियाने (Australia) दुसऱ्या डावात आश्वासक सुरुवात केली आहे. तिसऱ्या दिवसाखेर यजमान संघाने एकही विकेट न गमावता 21 धावा केल्या आणि 54 धावांची आघाडी घेतली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा डेविड वॉर्नर 20 आणि मार्कस हॅरिस 1 धाव करून खेळत होते. 186 धावांवर आघाडीचे 6 फलंदाज तंबूर परतल्यावर टीम इंडिया 200 धावांपर्यंत मजल मारेल का? अशी शंका प्रत्येकाच्या मनात होती. मात्र पदार्पणवीर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि दुसरा सामना खेळणाऱ्या शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) जबाबदारीनं फलंदाजी करत भारतीय संघाची धावसंख्या तीनशेपार नेली. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूडने (Josh Hazelwood) सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. शार्दूलने सर्वाधिक 67 धावा केल्या. सुंदरने 62 धावा फडकावल्या. सुंदर-शार्दुलच्या जोडीने ब्रिस्बेनमध्ये सातव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागिदारी केली आहे. (IND vs AUS 4th Test 2021: वॉशिंग्टन सुंदर-शार्दूल ठाकूर यांचा दे घुमा के! Gabba येथे रचली ऐतिहासिक भागीदारी)

तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने 2 बाद 62 धावांवरुन खेळणाया सुरुवात केली. पहिल्या सत्रात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे तर दुसऱ्या सत्रात मयंक अग्रवाल आणि रिषभ पंतही स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतले. आघाडीच्या फळीत रोहित शर्माने सर्वाधिक 44 धावा केल्या. मयंकने 38 तर कर्णधार रहाणेने 37 धावांचे योगदान दिले. अशास्थितीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात मोठी आघाडी घेऊन जाईल असे दिसत असताना शार्दूल-सुंदरच्या जोडीने आक्रमक पवित्रा घेतला आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना लोळवलं. टीम इंडिया अडचणीत असताना दोघांनी संघाला त्रिशतकी धावसंख्या पार करून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. बॉलिंगनंतर मराठमोळ्या शार्दूलने झुंजार अर्धशतकी खेळी केली. शार्दूलचं कसोटीमधील पहिलं अर्धशतक ठरलं. सातव्या विकेटसाठी शार्दूल आणि वॉशिंग्टनच्या नवख्या जोडीने झुंजार शतकी भागीदारी करत डाव सावरला. दोघांनी सातव्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली. शार्दूलने एकूण 115 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह एकूण 67 धावांची खेळी केली.

सुंदर आणि शार्दूलच्या जोडीच्या फटकेबाजीमुळे कांगारू संघाला दुसऱ्या डावात फक्त 33 धावांची आघाडी घेता आली. टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांनी धावसंख्येत एकूण 150 धावांची भर घातली.

(The above story first appeared on LatestLY on Jan 17, 2021 01:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).