IND vs AUS 4th Test Day 3 Live Streaming: ब्रिस्बेनच्या (Brisbane) गब्बा (Gabba) मैदानावर भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटी मालिकेच्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ खेळला जाणार आहे. दुसऱ्या दिवसाचे अंतिम सत्र पावसामुळे वाया गेल्यामुळे खेळ अर्धातास लवकर सुरु होईल. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 369 धावांपर्यंत मजल मारली तर भारताने दॆवसाखेर 2 विकेट गमावून 62 धावा केल्या आहेत. आता गब्बा (Gabba) स्टेडियमवर तिसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 5:00 वाजता सुरु होईल. भारतीय चाहते ब्रिस्बेन टेस्टच्या (Brisbane Test) तिसऱ्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. सोनी टेन 1 एचडी/एसडी आणि सोनी सिक्स एचडी/एसडी इंग्रजी कमेंट्री तर हिंदी कमेंट्री सोनी टेन 1 एचडी/एसडी वर उपलब्ध असेल. शिवाय, Sony LIV अॅपवर चाहत्यानां लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. Jio आणि Airtel यूजर्स सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जियो टीवी आणि एयरटेल स्ट्रीमवर पाहू शकतात. (Rohit Sharma: 'माझे बाद होणे दुर्देवी आहे, पण त्याबद्दल मला खंत नाही' ट्रोलर्सला रोहित शर्मा याचे उत्तर)
कर्णधार अजिंक्य रहाणे आणि टेस्ट स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा यांच्यावर भारताची मदार असेल. पुजारा 8 तर रहाणे 2 धावांवर खेळत आहे. टीम इंडियाचे दोन्ही सलामी फलंदाज- शुभमन गिल आणि रोहित शर्मा- यापूर्वीच माघारी परतले आहेत. शुभमन स्वस्तात बाद झाला तर रोहितचे अर्धशतक थोडक्यात हुकले. रोहितने 6 चौकारांच्या मदतीन 44 धावांची खेळी केली. अशास्थितीत टीम टीम इंडियाच्या या दोन अनुभवी खेळाडूंवर डाव सावरण्याची मोठी जबाबदार असेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन गोलंदाज या दोन्ही भारतीय फलंदाजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेनने 108 तर कर्णधार टिम पेन याने 50 धावांची महत्वपूर्ण खेळी केली.
असा आहे भारत-ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया: डेविड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लाबूशेन, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमरुन ग्रीन, टिम पेन (कॅप्टन/विकेटकीपर), पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन.
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कॅप्टन), मयंक अग्रवाल, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी.