IND vs AUS 4th Test 2021: ब्रिस्बेनच्या गब्बा (Gabba) येथे सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटी मालिकेत भारताचा संघर्ष जरी आहे. चहापानाच्या वेळेपर्यंत वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि शार्दूल ठाकूरच्या (Shardul Thakur) सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीने संघाचा (Indian Team) डाव सावरला असून टीमने 6 विकेट गमावून 253 धावांपर्यंत मजल मारली असून संघ अद्या 116 धावांनी पिछाडीवर आहे. पदार्पणवीर सुंदर 38 धावा आणि शार्दूल 33 धावा करून खेळत आहेत. ब्रिस्बेन कसोटीत (Brisbane Test) कोणत्याही भारतीय फलंदाजांनी 49 पेक्षा अधिक धावांची भागिदारी केलेली नव्हती. परंतु, संघ संघ बॅकफुटवर ढकलला गेला असताना नवोदित शार्दुल आणि सुंदरने पुढाकार घेत संघाला मजबुती देण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी, दुसऱ्या सत्रात जोश हेझलवूडने (Josh Hazelwood) भारताला दोन मोठे धक्के देत संघाला बॅकफूटवर ढकललं होतं. दुसऱ्या सत्रात मयंक अग्रवाल 38 धावा आणि रिषभ पंत 23 धावा करून परतले. (IND vs AUS 4th Test Day 3: मयंक अग्रवालने नॅथन लायनच्या चेंडूवर लागवलेला गगनचुंबी षटकार पाहून अचंबित व्हाल, पहा व्हायरल Video)
दुसऱ्या सत्रात भारताला पाचवा फटका मयंक अग्रवालच्या रुपात बसला. मयंकने 75 चेंडूंत 38 धावा केल्या आणि स्टीव्ह स्मिथकडे हेझलवुडच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यांनतर हेझलवूडने पंतला बाद करत संघाला पाचवा धक्का दिला. पंत 29 चेंडूंत 23 धावा करत कॅमरुन ग्रीनकडे झेलबाद झाला. अशा स्थितीत संघ मोठी धावसंख्या पार करू शकणार की नाही अशी शंका असताना वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूरबे सातव्या विकेटसाठी 50 हून अधिक धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाज क्रीजवर टिकून खेळत आहे आणि दोंघांनी कांगारू संघाच्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. दोघांनी प्रत्येकी 5 चौकार ठोकले असून शार्दूलने 1 षटकारही खेचला आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात चेतेश्वर पुजारा 94 चेंडूत 25 धावा करून आणि कर्णधार अजिंक्य रहाणे 93 चेंडूंचा सामना करत 37 धावांवर माघारी परतले. यापूर्वी, पुजारा आणि रोहित शर्मा यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी झाली होती. सुंदर आणि शार्दूलने संघाकडून पहिल्या डावात पहिली अर्धशतकी भागीदारी केली आहे.
दरम्यान, पहिले फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया संघाने मार्नस लाबूशेनच्या शतकी खेळीच्या जोरावर 369 धावांपर्यंत मजल मारली होती. लाबूशेनने सर्वाधिक 108 धावा तर कर्णधार टिम पेनने 50 धावांचे योगदान दिले.