IND vs AUS 4th Test Day 3: मयंक अग्रवालने नॅथन लायनच्या चेंडूवर लागवलेला गगनचुंबी षटकार पाहून अचंबित व्हाल, पहा व्हायरल Video
मयंक अग्रवालने लागवला गगनचुंबी षटकार (Photo Credit: Twitter/cricketcomau)

IND vs AUS 4th Test 2021: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचा शेवटचा सामना ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) खेळला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस असून यजमान ऑस्ट्रेलियाच्या 369 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने (Indian Team) लंच ब्रेकपर्यंत चार विकेट गमावून 161 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात दुखापतग्रस्त होऊन मायदेशी परतलेल्या हनुमा विहारीच्या जागी संघाने मयंक अग्रवालचा (Mayank Agarwak) समावेश केला. सलामीला येणार मयंकवर यंदा मधल्या फळीची जबाबदारी सोपवण्यात आली. लंच ब्रेकपर्यंत मयंकने एकूण 73 चेंडूंचा सामना केला होता, ज्यात त्याने तीन चौकार आणि एक शानदार गगनचुंबी षटकार लगावला. मयंकने 58व्या ओव्हरमध्ये नॅथन लायनच्या (Nathan Lyon) चेंडूवर एकमेव षटकार ठोकला. यावेळी तो 28 धावांवर खेळत होता. मयंकने लागवलेला हा षटकार थेट स्टॅन्डमधील एका चाहत्याच्या हातात गेला जो चेंडू पकडून खूप खुश दिसला. मयंकच्या या षटकाराची लांबी 102 मीटर होती. (IND vs AUS 4th Test 2021: अजिंक्य रहाणेला मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर मिळाले दोन जीवदान पण नंतर गमावली विकेट, पाहून तुम्हीही म्हणाल किती हे दुर्दैव!)

जेव्हा संघाने दुपारच्या जेवणानंतर पुन्हा खेळण्यास सुरुवात केली, तेव्हा मयंकने ऑस्ट्रेलियन फिरकी हल्ल्यावर वर्चस्व राखले. लायनने गोलंदाजीने मयंकसमोर अडचण निर्माण करत राहिला, पण हुशार अगरवालने गोलंदाजीविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. मयंकला यापूर्वी डाऊन अंडर दौऱ्यावर पहिल्या दोन सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले गेले होते, मात्र ओपनर एकदाही मोठी खेळी करू शकला नाही परिणामी रोहित शर्माच्या कमबॅकनंतर त्याला बाहेर केले गेले. मयंक वगळता पृथ्वी शॉ याला देखील खराब कामगिरीचा फटका बसला. अ‍ॅडिलेड सामन्यातील अपयशानंतर शुभमन गिलला दुसऱ्या मेलबर्न कसोटी सामन्यातून पदार्पणाची संधी देण्यात आली ज्याने आजवर ओपनर म्हणून प्रभावी कामगिरी बजावली आहे. दरम्यान, पहा मयंकचा गगनचुंबी षटकार:

तथापि, मयंकला आपली लय कायम ठेवता आली नाही आणि दुपारच्या जेवणानंतर त्याने अवघ्या दोन चेंडूंचा सामना केला व जोश हेजलवुडचा शिकार बनला. मयंकने हेझलवूडच्या बाहेर जात असलेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू बॅटच्या कडेला लागला आणि स्लिपवर स्टीव्ह स्मिथकडे झेलबाद झाला. ब्रिस्बेन येथे खेळल्या जाणार्‍या या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अ‍ॅडिलेड येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दणदणीत पराभव पत्करावा लागला होता तर मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात भारतीय संघाने शानदार पुनरागमन करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.