Jasprit Bumrah Injury Update: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचा अंतिम आणि निर्णायक सामना शुक्रवार, 15 जानेवारीपासून खेळला जाणार असून यापूर्वी टीम इंडिया फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर (Vikram Rathour) यांनी माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि रिषभ पंत यांच्याविषयी प्रश्न विचारले गेले तेव्हा ते म्हणाले की, शुक्रवारी सामन्यापूर्वी त्यांच्या खेळण्यावर निर्णय होईल. गुरुवारी टीम इंडियाने (Team India) आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केलेली नसून टॉस दरम्यान संघ जाहीर होईल. भारतीय संघाच्या (Indian Team) माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आलेले विक्रम म्हणाले की, "वैद्यकीय पथक बुमराहबरोबर काम करत आहे. जसप्रीत बुमराह खेळू शकणार की नाही हे आम्हाला शुक्रवारी सकाळी कळेल. जर तो खेळू शकतो तर तो खेळेल आणि खेळू शकत नसल्यास तर तो खेळणार नाही." पहिल्या तीन कसोटी सामन्यांप्रमाणेच भारताने चौथ्या सामन्यासाठी एकदिवसापूर्वी इलेव्हनची घोषणा केली नाही. (IND vs AUS 4th Test 2021: गब्बा मैदानावर चार भारतीय खेळाडूंचा राहीला दबदबा, 'या' टीम इंडिया कर्णधाराने ठोकले सर्वात लोकप्रिय शतक)
टीम इंडियाचा फलंदाजी प्रशिक्षक पुढे म्हणाले की, "दुखापतींवर नजर ठेवली जात आहे. आमचे वैद्यकीय कर्मचारी त्यांच्यावर नजर ठेवून आहेत. मी याबद्दल आता काहीही बोलण्याची स्थितीत नाही. आम्ही त्यांना जास्तीत जास्त वेळ देऊ इच्छितो. उद्या सकाळी आपल्याला कळेल की संघ कोणत्या इलेव्हनसह मैदानात उतरेल." ऑस्ट्रेलिया दौर्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंची दुखापत व्यवस्थापनाची सर्वात मोठी चिंता बनली आहे. जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त होणार लेटेस्ट खेळाडू आहे. बुमराहच्या पोटात सिडनी कसोटीदरम्यान बॉलिंग करताना ताण आला होता. तथापि, संघ व्यवस्थापनाने आपला दृष्टीकोन स्पष्ट केला आहे की जर बुमराह 50 टक्केही तंदुरुस्त असेल तर तो मालिकेच्या शेवटच्या सामन्यात नक्की खेळेल.
Medical team is working with him. We'll need to wait till tomorrow morning to know how fit he is, whether he will be able to play or not. If he can play, he will play but if he can't, of course, he won't: Team India's batting coach Vikram Rathour, on Jasprit Bumrah #AUSvIND pic.twitter.com/zyx0PIpR6S
— ANI (@ANI) January 14, 2021
रवींद्र जडेजाला फ्रॅक्चर आणि हनुमा विहारीला हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे यापूर्वीच चौथ्या ब्रिस्बेन कसोटी बाहेर पडावे लागले आहे. रिषभ पंतच्या उजव्या कोपऱ्यालाही दुखापत झाली आहे तर अश्विनला देखील पाठीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या मालिका 1-1 अशा बरोबरीत असल्याने आता गाब्बा येथे अंतिम सामना खेळला जाईल जिथे ऑस्ट्रेलियाने 1988 पासून एकही कसोटी सामना गमावलेला नाही.