IND vs AUS 2nd ODI: भारतीय गोलंदाजांची धुलाई होत असताना प्रशिक्षक रवि शास्त्री घेत होते डुलकी, पाहा व्हायरल Photo
रवि शास्त्री (Photo Credit: Twitter)

IND vs AUS 2nd ODI: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारतीय संघात (Indian Team) सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियन सलामी जोडी- आरोन फिंच आणि डेविड वॉर्नर यांनी पुन्हा एकदा संघाला भक्कम सुरुवात करून दिली आणि मोठ्या पाया रचला. ऑस्ट्रेलियाने स्टिव्ह स्मिथचे झंझावाती शतक, फिंच-वॉर्नर आणि अखेरीस मार्नस लाबूशेन व ग्लेन मॅक्सवेल यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर 389 धावांपर्यंत मजल मारली आणि टीम इंडियासमोर 390 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व कायम ठेवले आणि स्मिथचे आक्रमक शतक व इतर फलंदाजांनी त्याला दिलेली उत्तम साथीच्या जोरावर सलग दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. एकीकडे भारतीय गोलंदाजांची धुलाई होत असताना संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) काय करत होते माहित आहे? (IND vs AUS 2020-21: विराट कोहलीला जाणवतेय 'या' गोष्टीची कमतरता, ज्याचे एमएस धोनी आणि सौरव गांगुली होते धनी)

ट्विटरवर सध्या रवि शास्त्री यांचा फोटो व्हायरल होत आहे ज्यात भारतीय प्रशिक्षक डुलकी घेताना दिसत आहेत. शास्त्री यांचे डुलक्या घेतानाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि यूजर्स त्यांच्यावर Memes बनवून प्रतिक्रिया देत आहेत. पाहा शास्त्री यांचे फोटो...

शास्त्री यांच्या फोटोवर यूजर्सच्या प्रतिक्रिया:

वाईट स्वप्न

हरकत नाही, मूडमध्ये असतील 

कोच बदलला 

रवि शास्त्री

दरम्यान, दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत चार गडी गमावून भारताविरुद्ध 389 धावांची विशाल धावसंख्या नोंदवली. भारताविरुद्ध वनडेमधील ऑस्ट्रेलियाची ही सर्वाधिक धावासंख्या आहेत. ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात 374 धावा केल्या होत्या आणि दुसर्‍या वनडे सामन्यात या धावसंख्येला मागे टाकत नवा आकडा नोंदवला. ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नरने 77 चेंडूंत 4 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 83 धावा केल्या. फिंचने 69 धावांमध्ये 60 चेंडूंचा सामना केला आणि सहा चौकार व एका षटकार खेचला. तर, या मालिकेत स्मिथने सलग दुसरे शतक ठोकले आणि 64 चेंडूंत सर्वाधिक 104 धावा केल्या.