शुक्रवारी ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध राजकोटमधील दुसर्या वनडे सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharm) 7000 धावा पूर्ण करणारा चौथा भारतीय (Indian Opener) सलामी फलंदाज ठरला. भारतीय संघाचा उपकर्णधार रोहितने वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून विश्वविक्रम नोंदविला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या या स्वरूपात सलामी फलंदाज म्हणून वेगवान 7000 धावा करणारा रोहित जगातील पहिला फलंदाज बनला आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसर्या वनडे सामन्यात हा टप्पा गाठला आहे. राजकोटच्या (Rajkot) सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 18 धावा करताच हिटमन रोहितने आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये सलामी फलंदाज म्हणून हा टप्पा गाठला. यासह, वनडे क्रिकेटमध्ये सलामी फलदांज म्हणून वेगवान 7 हजार धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. या प्रकरणात रोहितने दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामी फलंदाज हाशिम आमला (Hashim Amla) आणि भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांना मागे टाकले आहे. (IND vs AUS 2nd ODI: राजकोट पीच तयार करण्यासाठी वृद्ध महिलांनी ब्रश वापरलेले पाहून Netizens उडवली सौरव गांगुली याची खिल्ली, पाहा हा Video)
32 वर्षीय रोहितने 137 व्या डावात सलामीला येत 7000 धावा पूर्ण केल्या आहेत, तर आमलाने 147 डावात ही आश्चर्यकारक कामगिरी केली होती. दुसरीकडे, क्रिकेटचा देव म्हटल्या जाणार्या सचिनने 160 डावांमध्ये वनडे क्रिकेटमध्ये सलामी फलंदाजाच्या रूपात 7000 धावा पूर्ण केल्या होत्या. शिवाय, हा टप्पा गाठणारा रोहित फक्त चौथा भारतीय आहे. यापूर्वी, सचिन, सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांनी ही कामगिरी केली आहे.
राजकोटमधील सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांविरुद्ध रोहित चांगल्या लयीत दिसत होता, मात्र अॅडम झांपा 44 चेंडूत42 धावा करून तो अखेर माघारी परतला. तो आणखी एक विक्रम पूर्ण करण्याच्या जवळ होता, पण वनडे सामन्यात 9000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला अवघ्या चार धावांनी कमी पडल्या. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने राजकोटमध्ये भारताला फलंदाजीचा आमंत्रण दिले. मुंबई येथे झालेल्या पहिल्या सामन्यात 10 विकेटने विजय मिळवल्यानंतर तीन सामन्यांच्या मालिकेत पाहुण्या संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.