भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाला 10 विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले. आता राजकोटच्या (Rajkot) सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये दुसरा सामना खेळला जात आहे. भारतीय क्रिकेट संघासाठी (Indian Team) हा सामना करो वा मरोच्या स्थिती सारखा आहे. पण हा सामना सुरु होण्याआधी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये काही महिला खेळपट्टी साफ करताना दिसत आहेत. या सामन्यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये काही महिला मैदान साफ करताना दिसत आहेत. कॅप्शनमध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने लिहिले आहे - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा दुसरा वनडे सामना. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची यूजर्स खिल्ली उडवत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील निर्णायक सामन्यादि काही वृद्ध महिला मुख्य खेळपट्टी साफ करण्यासाठी ब्रशचा वापर करत असल्याचे दिसत आहे. (IND vs AUS 2nd ODI: आरोन फिंच याचा टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय, टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये झाले 'हे' बदल)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यावर बर्‍याच भारतीय चाहत्यांना असे वाटले की या व्हिडिओमुळे भारतीय मैदानाविषयी वाईट चित्र समोर येत आहे आणि बीसीसीआयने खेळपट्टीच्या देखभालीसाठी अधिक चांगल्या उपकरणांमध्ये गुंतवणूक करावी. काही चाहत्यांना असेही वाटले की वयोवृद्ध स्त्रियांना पुरुषांची कामे करण्यास भाग पाडता कामा नये. शिवाय, महिलांना मैदानाची साफसफाई करत असल्याचे पाहताना जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डा अश्या स्थितीवर क्रिकेट चाहते टीका करताना दिसले. पाहा हा व्हिडिओ:

लज्जित

खेळपट्टी राखण्यासाठी उपकरणे खरेदी करीत नाही

विश्वास बसत नाही

हे चांगले नाही

कोहली आणि संघाला खूप पैसे देतात

हेअर ड्रायर नंतर आता हे

दरम्यान, गुवाहाटी येथे श्रीलंकाविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यादरम्यान खेळपट्टी सुखावण्यासाठी हेअर ड्रायचा वापरला गेला होता. यासाठीही बीसीसीआयची खिल्ली उडवली गेली होती. वेळेवर खेळपट्टी सुखाली गेली नसल्याने सामना रद्द करावा लागपला होता.