भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) मधील दुसरा वनडे सामना थोड्याच वेळात राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये सुरु होईल. या सामन्यात ऑस्ट्रेलियाई कर्णधार आरोन फिंच (Aaron Finch) याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये काही बदल झाले नाहीत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामन्यात 10 विकेट्सने पराभवाला सामोरे गेल्यावर टीम इंडिया मोठे बदल करण्यात आले आहे. रिषभ पंत (Rishabh Pant) याला पहिल्या सामन्यात दुखापत झाल्याने त्याला बाहेर करण्यात आले असून केएल राहुल (KL Rahul) त्याच्या जागी विकेटच्या मागची जबाबदारी सांभाळेल. भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहे. पंतच्या जागी मनीष पांडे (Manish Pandey) याची वर्णी लागली असून नवदीप सैनी (Navdeep Saini) याला शादूल ठाकूर याच्या जागी स्थान मिळाले आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन डावाची सुरुवात करतील तर विराट पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी सज्ज आहे. मुंबई वनडे सामन्यात राहुल फलंदाजीसाठी तिसर्या स्थानावर आला होता तर कर्णधार कोहली चौथ्या क्रमांकावर आला होत्या, ज्यामुळे टीम इंडियाला मोठं नुकसान झालं होता. मात्र आता आपली चूक सुधारत कोहली पुन्हा तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करताना दिसेल.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झाला नाही/आहे. ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी डेविड वॉर्नर आणि कर्णधार फिंचने पहिल्या सामन्यात नाबाद शतकी खेळी करत विजयी संघाला 37.4 ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला. आजचा सामना जनकुन ऑस्ट्रेलिया मालिकेत विजय निश्चित करेल, तर टीम इंडियासाठी मालिकेत आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी ही अंतिम संधी आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेत 1-0 ने आधीच आघाडीवर आहे.
असा आहे भारत-ऑस्ट्रेलियाचा प्लेयिंग इलेव्हन
टीम इंडिया: रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल (विकेटकीपर), विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि नवदीप सैनी.
ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कॅप्टन), डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), अॅश्टन टर्नर, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, केन रिचर्डसन, अॅडम झँपा, अॅस्टन अगार.