IND-A vs AUS-A 2nd Practice Match: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) सुरुवातीला अवघे काही दिवस शिल्लक असताना टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया-अ (Australia-A) संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सराव सामना खेळला जात आहे. दुसर्या सराव सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रहाणेचा निर्णय चुकीचा ठरला आणि एका वेळी संघाची धावसंख्या 123-9 अशी असताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अर्धशतक झळकावत 200च्या जवळ धावसंख्या नेली. या दरम्यान ऑस्ट्रेलियन-अ संघाच्या गोलंदाजांनी भारताविरुद्ध शानदार गोलंदाजी केली आणि भारताच्या टॉप-ऑर्डरचा धुव्वा उडवला. हे प्रदर्शन पाहून माजी कांगारू फिरकीपटू ब्रॅड हॉग (Brad Hogg) याने भारतीय फलंदाजांवर टीका केली, पण माजी भारतीय सलामीवीर वसीम जाफरने (Wasim Jaffer) आपल्या प्रतिक्रियेने बोलती बंद केली. (IND-A vs AUS-A 2nd Tour Match: भारतीय फलंदाजांचा चौफेर हल्ला; हनुमा विहारी, रिषभ पंत यांच्या शतकी खेळीने दुसऱ्या दिवसाखेर भारताची 472 धावांची आघाडी)
पहिल्या डावात भारताचा अव्वल क्रमातील फलंदाज मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, कर्णधार अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांनी निराश केले. याशिवाय पृथ्वी शॉ आणि मयंकने जवळपास 40 धावा केल्या. यावर अनुभवी ऑस्ट्रेलियनने लिहिले की, "भारताच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना त्यांचा ऑफ स्टंप कोठे आहे हे जाणून घ्यावे, चांगल्या लेंथचा चेंडूला सोडणे शिकले पाहिजे सोबतच ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूचा पाठलाग करणेही टाळले पाहिजे.'' हॉगच्या या ट्विटवर जाफर यांनी प्रतिक्रिया दिली आणि माजी ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाजाची बोलती बंद केली. हॉगच्या ट्विटवर [प्रतिक्रिया देताना जाफरने लिहिले की, “ऑस्ट्रेलियाला त्यांची शीर्ष क्रम काय आहे हे माहित असणे आवश्यक आहे.” पाहा हॉग आणि जाफर यांचा ट्विटर वॉर:
Indian top order need to know where their off stump is, learn to leave the ball off a good length, and not chase the ball moving away outside off stump. #HoggysTips #AUSAvIND
— Brad Hogg (@Brad_Hogg) December 12, 2020
जाफर यांची प्रतिक्रिया:
Australia need to know who their top order is 😏 #AusvInd https://t.co/tRlrGdoqEi
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) December 12, 2020
जाफर यांनी या कारणाने लिहिले कारण मागील काही काळापासून कांगारू संघ सतत दुखापतीच्या समस्येशी झगडत आहे. संघाचा सलामीवीर डेविड वॉर्नर आणि युवा फलंदाज विल पुकोव्स्की दुखापतीमुळे भारताविरुद्ध पहिल्या सामन्यातून बाहेर पडले आहेत. दरम्यान, दुसर्या सराव सामन्यात पहिल्या डावात भारताच्या 194 धावांच्या उत्तरात ऑस्ट्रेलिया-अ संघ पहिला डाव 108 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. पहिल्या डावाच्या जोरावर भारताला 86 धावांची चांगली आघाडी मिळाली आणि दुसरा डाव 386 धावांवर घोषित केला व ऑस्ट्रेलियापुढे 473 धावांचे विशाल लक्ष्य दिले.