India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका (IND vs BAN 2nd T20I) खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून टीम इंडिया 1-0 ने पुढे आहे. आज दुसरा टी-20 सामना (IND vs BAN 2nd T20I) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium, Delhi) खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. याशिवाय 7 वाजता नाणेफेक होईल. दुसरीकडे, टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिकेत अजेय आघाडी मिळवायची आहे, तर बांगलादेश संघाला हा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे.
सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर (IND vs BAN 2nd T20I Key Players)
सूर्यकुमार यादव
भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव जुलैनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात त्याने त्याची पुन्हा एकदा जादु दाखवली. त्यामुळे आजच्या सामन्यात सूर्यकुमार यादव आपल्या स्फोटक फलंदाजीने सामन्याचा मार्ग बदलू शकतो.
अभिषेक शर्मा
स्टार सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी करत होता, पण तो 16 धावांवर धावबाद झाला. या युवा फलंदाजाला आजच्या सामन्यात बांगलादेशी गोलंदाजांचा सामना करायला आवडेल. संघातील त्याची स्फोटक फलंदाजी सामन्याला वेगळच वळण देवू शकते. त्यामुळे आजच्या सामन्यात चाहत्यांची नजर त्याकडेही राहील.
Will the hosts 🇮🇳 wrap up the series or will the Tigers spring a surprise? 🤔
Catch the 2nd #INDvBAN T20I LIVE on #JioCinema, #Sports18 & #ColorsCineplex 👈#IDFCFirstBankT20ITrophy #JioCinemaSports pic.twitter.com/dE9zkSV5DF
— JioCinema (@JioCinema) October 9, 2024
मयंक यादव
बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत ज्या गोलंदाजावर संपूर्ण देशाच्या नजरा खिळल्या असतील तो म्हणजे मयंक यादव. मयंक यादवने पदार्पणातच आपले कौशल्य दाखवुन सगळ्यांना आपल्या घातक गोलंदाजीने वेड लावले. आज दुसऱ्या सामन्यात तो काय कमाल करतो यावर संगळ्याच्या नजरा असतील.
हार्दिक पांड्या
आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 मध्ये आपल्या कामगिरीने चाहत्यांची मने जिंकणारा हार्दिक पांड्या बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत कमालीच्या फार्ममध्ये दिसत आहे. पहिल्या सामन्यात त्याने बाॅलिंग आणि फलंदाजीत महत्वपुर्ण कामगिरी केली. तसेच 16 चेंडूत 39 धावंची वादळी खेळी खेळत सामना जिंकून दिला.
मेहदी हसन मिराज
मेहदी हसन मिराजने गेल्या सामन्यात बांगलादेश संघासाठी चांगली कामगिरी केली होती. पहिल्या टी-20 सामन्यात मेहदी हसन मिराजने 35 धावा केल्या आणि 1 बळी घेतला. आजच्या सामन्यातही बांगलादेश संघाला मेहदी हसन मिराझकडून मोठ्या अपेक्षा असतील.
अर्शदीप सिंग
पहिल्या टी-20 सामन्यात अर्शदीप सिंगने शेवटच्या सामन्यात 3.5 षटकात 14 धावा देत तीन बळी घेतले होते. या सामन्यात अर्शदीप सिंगही सामनावीर ठरला आहे. आजही अर्शदीप सिंग आपल्या घातक गोलंदाजीने फलंदाजांना घाम फोडू शकतो.
वरुण चक्रवर्ती
टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वरुण चक्रवर्तीने गेल्या सामन्यातही चांगली गोलंदाजी केली. वरुण चक्रवर्तीने बांगलादेशच्या तीन फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले होते. आजही वरुण चक्रवर्तीला त्याच पद्धतीने परफॉर्म करायला आवडेल.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
टीम इंडिया
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव.
बांगलादेश
लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), परवेझ हुसेन आमोन, तौहीद ह्रदोय, महमुदुल्ला, जेकर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तंजीम हसन साकीब, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.