ICC World Cup 2019 Final: न्यूझीलंडच्या जिमी नीशमची भारतीय चाहत्यांना लॉर्ड्स येथील मॅचच्या तिकिटांची पुनर्विक्री करण्याची मागणी, Netizens म्हणाले आमचा तुम्हालाच पाठिंबा
(Photo by Mike Hewitt/Getty Images)

आयसीसी (ICC) विश्वचषक आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचले आहे. रविवारी इंग्लंडच्या प्रख्यात लॉर्ड्स (Lords) मैदानावर न्यूझीलंड (New Zealand) आणि यजमान इंग्लंड (England) संघात विश्वचषकाचे फायनल खेळण्यात येणार आहे. या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे, क्रिकेट जगातला एक नवीन विश्वचषक विजेता मिळणार आहे. याआधी इंग्लंड संघ 1979, 1987 आणि 1992 मध्ये विश्वचषकच्या फायनलमध्ये पोहचला होता पण त्यांना रनर-अप म्हणून समाधान मानावे लागले. दुसरीकडे न्यूझीलंड संघाने सलग दुसऱ्यानंद विश्वचषकच्या फायनलमध्ये पोहचला आहे. न्यूझीलंड संघ याआधी 2015 च्या विश्वचषकच्या फायनलमध्ये पोहचला होता. पण, इंग्लंड आणि न्यूझीलंड मधील ब्लॉकबस्टर सामन्याआधी न्यूझीलंडचा अष्टपैलू जेम्स नीशम (James Neesham) याने ट्विटर द्वारे चाहत्यांना विनंती केली आहे. (ENG vs AUS, CWC 2019 Semi-Final: ग्लेन मॅग्राथ याचा मोठा विक्रम मोडत मिचेल स्टार्क ने एका विश्वचषकमध्ये घेतल्या सर्वाधिक विकेट्स)

नीशम याने भारतीय चाहत्यांना विनंती केली आहे की जर ते लॉर्ड्स येथील अंतिम सामना बघण्यासाठी येणार नाही तर त्यांनी आपले तिकीट खऱ्या क्रिकेट चाहत्यांना ज्यांना खरोखरच हा मोठा सामना पाहायचा आहे त्यांना विकावे. नीशमच्या या ट्विटला भारतीय चाहत्यांनी देखील भरपूर प्रतिसाद दिले आणि म्हणाले की, भारतीय क्रिकेट फॅन्स हे खरे क्रिकेट चाहते आणि जरी भारतीय संघ फायनलमध्ये साला तरी ते तेथे उपस्थित असणार आहेत, कारण ते ब्लॅककॅप्सला समर्थन देत आहेत. पहा भारतीय चाहत्यांची प्रतिक्रिया:

दरम्यान, न्यूझीलंड संघाने आपल्या विश्वचषकची सुरुवात दमदार पणे केली होती. त्यांनी आपले पहिले चारही सामने जिंकले होती आणि त्यामुळे सर्वांना वाटलं होतं की त्यांचा संघ सेमीफायनलमध्ये नक्की प्रवेश करेल. न्यूझीलंडने सेमीफायनल सामन्यात भारत (India) सारख्या मजबूत संघाचा पराभव केला आणि फायनलमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे, यजमान इंग्लंडने गतजेते ऑस्ट्रेलिया (Australia) संघाचा दणाणून पराभव करत फायनलचे तिकीट मिळवले.