मिचेल स्टार्क (Image Credit: AP/PTI Photo)

ऑस्ट्रेलिया (Australia) चा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क (Mitchell Starc) याने आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमधील यजमान इंग्लंड (England) विरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात एका मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. इंग्लंड च्या जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याला बाद करत स्टार्कने एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. इंग्लंडविरुद्ध च्या विकेटसह स्टार्क ने यंदाच्या विश्वचषकमध्ये 27 विकेट घेतल्या आहेत. याचबरोबर स्टार्क याने ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रा (Glenn McGrath) चा 12 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला. मॅक्ग्राने 2007 मध्ये वेस्ट इंडिज (West Indies) येथे झालेल्या विश्वचषकमध्ये 26 गाडी बाद करत या विक्रमवीर आपले नाव लिहिले होते. (ENG vs AUS सेमीफानला सामन्यादरम्यान एजबस्टन स्टेडियमवर घिरट्या मारताना दिसला 'वर्ल्ड मस्ट स्पीक फॉर बलुचिस्तान' बॅनर लावलेला हेलिकॉप्टर Video)

दरम्यान, टॉस जिंकून फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया ने इंग्लंडसमोर जिंकण्यासाठी 224 धावांचे लक्ष दिले आहे. ऑस्ट्रेलियासाठी माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याने एकाकी लढा दिला. मिशेल स्टार्स (Mitchell Starc) ने स्मिथला चांगली साथ दिली . स्मिथने 119 चेंडूत 85 धावा केल्या तर स्टार्कने 36 चेंडूत 29 धावा केल्या. स्मिथ आणि स्टार्क यांना वगळता दुसऱ्या कोणाही खेळाडूला चांगली फलंदाजी करणे जमले नाही.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात तब्बल 44 वर्षांनी सेमीफायनलचा सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड संघातून विजयी होणारी टीम फायनलमध्ये न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध भिडेल. त्यामुळे कोणता संघ अंतिम फेरीत धडक मारणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ऑस्ट्रेलियाने पाच वेळा विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली आहे तर इंग्लंडने एकदाही हा खिताब जिंकला नाही.