आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये आज यजमान इंग्लंड (India) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना खेळला जात आहे. या सामन्यात टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया संघाला 223 धावाच करता आल्या. मात्र, एजबस्टन (Edjbaston) च्या स्टेडियमवर या सामन्यादरम्यान एक हेलिकॉप्टर घिरट्या मारताना दिसले. या हेलिकॉप्टरमधून 'वर्ल्ड मस्ट स्पीक फॉर बलुचिस्तान' बॅनर बाहेर पडला. याआधी अफगाणिस्तान (Afghanistan)-पाकिस्तान (Pakistan) आणि भारत (India)-श्रीलंका (Sri Lanka) सामान्यवेळी असं झालं होते. या सामन्यादरम्यान एजबस्टन स्टेडियमवर 'जगाने बलूचिस्तानसाठी विषयी बोलणे आवश्यक आहे" असं लिहिले बॅनर आकाशात फडकावले. (ENG vs AUS, World Cup 2019 Semi-Final मॅचमध्ये रिकी पॉन्टिंग याला मागे टाकत इंग्लंडच्या जो रुटने रचला विश्वचषक रेकॉर्ड)
दरम्यान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या झालेल्या साखळी सामन्यात 'जस्टीस फॉर बलूचिस्तान' संदेशांसह बॅनर लीड्स (Leeds) च्या मैदानावरील आकाशात फडकलावं होता. तर भारत-श्रीलंका सामन्यादरम्यान 'जस्टिस फॉर काश्मीर' (Justice For Kashmir) असे बॅनर लावलेला हेलिकॉप्टर घिरट्या मारताना दिसला.
Plane with a banner calling for World attention on Pakistan Army’s atrocities against Baloch people appears during England Vs Australia Semifinal Match at Birmingham, UK. Banner reads: ‘World Must Speak up for Balochistan’. Embarrassment for Pakistan yet again. pic.twitter.com/TpiKgMxaln
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) July 11, 2019
दुसरीकडॆ, आयसीसीने घटनांची नोंद घेत निराशा व्यक्त केली आहे. त्यावेळी आयसीसीने स्पष्टीकरण देत म्हणते होते की स्थानिक पोलिसांच्या मदतीने चौकशी सुरू असून भविष्यात असे प्रकार होणार नाहीत. मात्र, युवा तिसऱ्या घटनेनंतर हे बोलणे चुकीचे ठरणार नाही की आयसीसीने यावर काहीच ठोस पाऊले उचलली नाही.