Mohammed Siraj- Travis Head (Photo Credit - X)

IND vs AUS 2nd Test 2024: ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलिया आणि भारत (IND vs AUS) यांच्यातील सामन्यादरम्यान वातावरण खुपच गरम दिसले. गुलाबी चेंडूच्या या कसोटीत मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) खूपच आक्रमक दिसत होता. मार्नस लॅबुशेननंतर त्याची ट्रॅव्हिस हेडशीही (Travis Head) लढत झाली. यानंतर ऑस्ट्रेलियन चाहते त्याच्या पाठी लागले आणि त्याची डिवचू लागले. माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि मीडिया देखील त्याच्यावर टीका करताना दिसले, मात्र सिराजने नंतर हेडचे आरोप फेटाळून लावले. आता त्यांच्या भांडणाचे प्रकरण आयसीसीपर्यंत पोहोचले असून ते दोन्ही खेळाडूंवर कारवाई करणाच्या तयारीत आहे. (हे देखील वाचा: WTC 2025 फायनलच्या शर्यतीत 'हे' चार संघ कायम, जाणून घ्या भारतासह सर्व देशांचे समीकरण)

आयसीसी करु शकते कारवाई

द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, आयसीसीने आता या प्रकरणाची दखल घेतली असून दोन्ही खेळाडूंना शिस्तभंगाच्या सुनावणीसाठी बोलावले आहे. यावेळी ते दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेणार आहे. तथापि, दोन्ही खेळाडूंना काळजी करण्यासारखे काही नाही, कारण त्यांना कोणत्याही प्रकारच्या निलंबनाचा सामना करावा लागणार नाही. रिपोर्टनुसार, कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजसाठी आयसीसीच्या आचारसंहितेत फारच कमी शिक्षा आहे. ॲडलेडमध्ये पिंक बॉल टेस्टच्या दुसऱ्या दिवशी सिराज आणि हेड यांच्यात शाब्दिक युद्ध झाले.

ॲडलेड ट्रेव्हिस हेडचे होम ग्राउंड

हेडने 140 धावा केल्या होत्या, त्यानंतर सिराजने त्याला स्विंगिंग यॉर्करवर बोल्ड केले आणि पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर दोघेही एकमेकांना भिडले. हेड आऊट झाल्यावर काहीतरी बोलला, त्यावर सिराजने प्रतिक्रिया दिली आणि काहीतरी बोलला आणि ड्रेसिंग रूमकडे बोट दाखवत रवाना झाला. तो आक्रमकपणे सेलिब्रेशन करतानाही दिसला. ॲडलेड हे हेडचे होम ग्राउंड आहे. या मैदानावर त्याच्यासोबत असे वागणे पाहून ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी बाऊंड्री लाईनवर सिराजला चिडवायला सुरुवात केली.

कोणी कोणाला केली शिवीगाळ?

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हेडने पत्रकार परिषदेत सिराजच्या चांगल्या गोलंदाजीचे कौतुक केल्याचा दावा केला होता. पण बदल्यात मला शिवीगाळ ऐकू आली. सिराज यांनी त्यांच्या वक्तव्याचे लगेच खंडन केले. आधी हेडने शिवीगाळ केल्याचा दावा त्यांने केला, त्या बदल्यात त्यांनी आक्रमक प्रतिक्रियाही दिली. मात्र, खेळाच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही खेळाडू हे प्रकरण सोडवताना दिसले. सिराजने फलंदाजी करताना हेडशी बोलून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर ही लढत संपल्याचे मानले जात आहे.