ICC Cricket World Cup 2019: अवघ्या 48 तासात विकली गेली भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे
India vs Pakistan Match (Photo Credits-PTI)

ICC Cricket World Cup 2019: आयसीसी वर्ल्ड कप 2019 साठी सुरुवात येत्या 30 मे पासून होणार आहे. तर इंग्लड अँन्ड वेल्स (England and Wales)  येथे सामने खेळवण्यात येणार आहेत. भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) संघाचा पहिला सामना 16 जून रोजी इंग्लड येथील ओल्ड ट्रैफर्ड (Old Trafford)  येथे होणार आहे. एका वृत्तानुसार भारत आणि पाकिस्तान संघाच्या सामन्यासाठीची सर्व तिकिटे 48 तासाच्या आतमध्येच खरेदी केली असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान आयसीसी चँम्पियन ट्रॉफी 2017 चा अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर आता 2 वर्षांनी वर्ल्डकपमध्ये या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. तर भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे.(ICC Cricket World Cup 2019 पूर्वी भारत संघाला मोठा धक्का बसणार,केदार जाधव संघातून बाहेर पडण्याची शक्यता)

वर्ल्डकपमध्ये अद्याप असे एकदासुद्धा झाले नसेल की भारताला पाकिस्तान संघापुढे पराभव स्विकारावा लागला आहे. दोन्ही संघात आता पर्यंत सहावेळा सामने वर्ल्डकपमध्ये खेळवण्यात आले आहे. त्यामध्ये नेहमीच भारताच्या संघाचा विजय झाला आहे. वर्ल्डकप 2019 च्या आयोजनकर्त्यांच्या मते भारत आणि पाकिस्तान संघामध्ये खेळवण्यात येणाऱ्या सामन्यावेळी जी उत्सुकता आहे ती भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यात दिसून येणार नाही असे म्हटले आहे.1983 आणि 2011 मधील विजेता भारतीय संघ त्यांचा पहिला सामना साऊथ आफ्रिका विरुद्ध खेळणार आहे.