ICC Cricket World Cup 2019 पूर्वी भारत संघाला मोठा धक्का बसणार,केदार जाधव संघातून बाहेर पडण्याची शक्यता
Kedar Jadhav (Photo Credits-Twitter)

ICC Cricket World Cup 2019 मे महिन्याच्या शेवटी सुरु होणार आहे. तर भारतीय संघाचा (Indian Team) पहिला सामना 5 जून रोजी आफ्रिकेत (Africa) खेळवला जाणार आहे. टूर्नामेंट सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसणार आहे. दरम्यान, रविवारी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) संघामध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्याच्या वेळी खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे आयपीएल (IPL) प्लेऑफ मध्ये सुद्धा केदार जाधव खेळणार की नाही यावर प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचसोबत असे ही म्हटले जात आहे की, वर्ल्डकप सामन्यासाठी सुद्धा केदार जाधव ह्याला या कारणामुळे संघातून बाहेर पडावे लागणार आहे.

सामन्यानंतर चैन्नई संघाचे मुख्यप्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी असे म्हटले आहे की, केदार जाधवला अद्याप दुखापतीचा त्रास होत आहे. परंतु मला नाही वाटत तो पुढील सामने खेळू शकणार असल्याचे ही फ्लेमिंग यांनी म्हटले आहे. तसेच बीसीसीआयने वर्ल्डकपसाठी काही नियमावली जाहीर केली. त्यामध्ये दुखापत झालेल्या खेळाडूबद्दल गंभीरपणे विचार केला जाईल असे म्हटले आहे.(Cricket World Cup 2019: आयसीसी वर्ल्ड कप सर्व संघ आणि खेळाडूंची नावे; पाहा कोणाकोणाला मिळाली संधी)

येत्या 30 मे पासून वर्ल्डकपची सुरुवात होणार आहे. पहिला सामना इंग्लड आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये खेळवला जाणार आहे. तर 5 जूनला भारत विरुद्ध आफ्रिकेचा सामना रंगणार आहे. यापूर्वी 1999 मध्ये इंग्लड येथे वर्ल्डकपचे सामने खेळवला गेला होता.