Cricket World Cup 2019: क्रिकेट खेळाचा जन्मदाता असलेल्या इंग्लंडमध्ये येत्या 30 मे पासून आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2019 (ICC Cricket World Cup 2019) सुरु होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या एकूण 10 देशांपैकी आतापर्यंत आठ देशांचे संघ घोषीत झाले आहेत. आयसीसी क्रिकेट (ICC Cricket ) वर्ल्ड कप स्पर्धा 2019 साठी संघ निवड करताना काही खेळाडूंनाच संधी मिळाली आहे. अनेक पात्र आणि इच्छूक खेळाडूंना संधी मिळाली नाही. केवळ भारतच नव्हे तर जगभरातील क्रिकेट विश्वचषक संघ निवडताना असे घडले आहे. त्यामुळे जाणून घ्या संघ घोषीत केलेल्या 8 देशांतील क्रिकेट वर्ल्ड कप टीम आणि त्यातील खेळाडू. प्रत्येक संघात एकूण 15 खेळाडू आहेत.
क्रिकेट वर्ल्ड कप टीम, संभाव्य खेळाडू
इंडिया क्रिकेट वर्ल्ड कप संघ : विराट कोहली (कर्णधार), जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, शिखर धवन, एमएस धोनी (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, केदार जाधव, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, केएल राहुल, मोहम्मद शमी, विजय शंकर, रोहित शर्मा आणि कुलदीप यादव.
इग्लंड क्रिकेट वर्ल्ड कप संघ: इयोन मोर्गन (कर्णधार), मोइन अली, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), जोस बटलर (विकेटकीपर), टॉम कर्रन, जो डेनली, अॅलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, आदिल राशिद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विल्ली, क्रिस वोक्स आणि मार्क वुड.
न्यूझिलंड क्रिकेट वर्ल्ड कप संघ: केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रैंडहोम, लॉकी फर्गसन, मार्टिन गुप्टिल, मैट हेनरी, टॉम लाथम (विकेटकीपर), कॉलिन मुनरो, जिमी नीशम, हेनरी निकोल्स, मिशेल सेंटनर, ईश सोढ़ी, टिम साउथी आणि रॉस टेलर.
दक्षिण अफ्रीका क्रिकेट वर्ल्ड कप संघ: फॉफ डु प्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), जेपी डुमिनी, एइडन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनिच नॉर्टे, एंडिले फेहलुकवायो, ड्वाइन प्रीटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, डेल स्टेन, इमरान ताहिर आणि रस्सी वॅन डेर डूसन. (हेही वाचा, ICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप 2019 'च्या कोहली ब्रिगेड मध्ये महाराष्ट्रातील 'रोहित शर्मा' आणि 'केदार जाधव'चे स्थान पक्के)
ऑस्ट्रेलिया क्रिकेट वर्ल्ड कप संघ: अॅरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), नाथन कूल्टर-नाइल, पैट कमिंस, उस्मान ख्वाजा, नाथन लियोन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झे रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेविड वार्नर आणि एडम जांपा.
पाकिस्तान क्रिकेट वर्ल्ड कप संघ: सरफराज अहमद( कर्णधार), इमाम उल हक, आबिद अली, जुनैद खान, बाबर आजम, मोहम्मद हफीज, फहीम अशरफ, मोहम्मद हुसैन, फखर जमान, शादाब खान, हारिस सोहेल, शाहीन अफरीदी, हसन अली, शोएब मलिक आणि इमाद वसीम.
बांग्लादेश क्रिकेट वर्ल्ड कप संघ: मशरफे मुर्तजा (कर्णधार), अबू जैद, लिटन दास (विकेटकीपर), महमुदुल्लाह, मेंहदी हसन, मोहम्मद मिथुन (विकेटकीपर), मोहम्मद सैफुद्दीन, मोसद्देक हुसैन, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मुस्ताफिजुर रहमान, रूबेल हुसैन, सब्बीर रहमान , सौम्या सरकार आणि तमीम इकबाल.
श्रीलंका क्रिकेट वर्ल्ड कप संघ: डिमुथ करुणारत्ने (कर्णधार), अविष्का फर्नांडो, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, एंजेलो मैथ्यूज, जीवन मेंडिस, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा (विकेटकीपर), थिसारा परेरा, नुवान प्रदीप, धनंजय डी सिल्वा, मिलिंडा सिरीवर्दाना, लहिरु थिरिमन्ने, इसुरु उदाना आणि जेफरी वांडरसे.
प्राप्त माहितीनुसार वरील संघात केवळ यजमान इग्लंडचा संघ असा आहे ज्याने आपले सर्वच्या सर्व 15 खेळाडूंच्या नावांची घोषणा केली आहे. वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना यजमान इग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. अद्याप दोन देशांच्या संघांची आणि त्यातील खेळाडूंची घोषणा होणे बाकी आहे.