ICC Cricket World Cup 2019: क्रिकेटमधील महारणसंग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्व चषकासाठी भारतीय संघ (India Team) उद्या (15 एप्रिल) आपल्या खेळाडूंच्या नावाची घोषणा करणार आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीस समिती, कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवि शास्री बीसीसीआय हेडक्वार्टर येथे यांची बैठक होणार आहे. त्यावेळी भारतीय संघाकडून विश्च चषकासाठी खेळवल्या जाणाऱ्या 15 खेळाडूंची वर्णी लागणार आहे. रिषभ पंत यांचे नाव संघाकडून घोषित करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विराट कोहली हा संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचसोबत रोहित शर्मा, शिखर धवन, धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, केदार जाधव, केएल राहुल, विजय शंकर आणि रिषभ पंत असे 15 खेळाडूंची वर्णी विश्व चषकासाठी लागणार आहे. तर संघात एक जागा खाली असून तेथे रवींद्र जडेजा किंवा चौथ्या स्थानकावर वेगवान गोलंदाजाला स्थान देण्यात येणार आहे.(हेही वाचा-ICC Cricket World Cup 2019 च्या स्पर्धेतून अंबाती रायुडू बाहेर; रायुडूच्या जागी 'या' खेळाडूला संघात स्थान देण्याची दिग्गजांची मागणी)
तर केएल राहुल ह्याला बॅकअप ओपनर म्हणून संघात स्थान मिळू शकते. तर वेगवान गोलंदाजपटू म्हणून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांच्यावर जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र संघात उत्तम कामगिरी करणारा खेळाडू अंबाती रायडू ह्याचे नाव गायब असल्याचे दिसून येत आहे. तर चौथ्या क्रमांवरील जबाबदारी राडूला संघात स्थान न दिल्यास कोणाला दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
संघातील संभावित खेळाडूंची नावे:
विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, केदार जाधव, विजय शंकर, केएल राहुल, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा.