शुक्रवारी 1 मे रोजी आयसीसी (ICC) क्रमवारीत मोठा फेरबदल झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटने कसोटी, वनडे आणि टी-20 ची ताजी रँकिंग जाहीर केली असून यामुळे भारत (India) आणि पाकिस्तानसारख्या संघांना मोठा धक्का बसला आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तानने अनुक्रमे, टेस्ट आणि टी-20 रँकिंगमधील पहिले स्थान गमावले आहे. या दोन्ही टीम्सला पछाडत ऑस्ट्रेलियाने क्रिकेटच्या सर्वात मोठ्या आणि लहान फॉरमॅटमध्ये पहिले स्थान मिळवले. ऑक्टोबर 2016 नंतर टीम इंडियाने टेस्ट क्रमवारीतील पहिले स्थान गमावले. 2016-17 मध्ये टीम इंडियाने 12 कसोटी सामने जिंकले होते, तर केवळ एक पराभव पत्करला. आणि 2016-17 मधील रेकॉर्ड हटवल्यामुळे रँकिंगमध्ये हे बदल पाहायला मिळायचे आयसीसीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. “ऑक्टोबर 2016 नंतर प्रथमच भारताला पहिले स्थान मिळवले. याचे मुख्य कारण असे की 2016-17मध्ये भारताने 12 कसोटी सामने जिंकले होते आणि फक्त एक कसोटी गमावली होती, ज्याची नोंदी काढली गेली," आयसीसीने दिलेल्या निवेदनात म्हटले. (ICC Rankings: ऑस्ट्रेलियाचा टीम इंडिया, पाकिस्तानला दे धक्का; आयसीसी टेस्ट आणि टी-20 रँकिंगमध्ये मिळवले अव्वल स्थान)
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध मालिकेसह टीम इंडियाने पाचही कसोटी मालिका जिंकल्या होत्या. त्या काळात ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. उल्लेखनीय म्हणजे, भारताने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला. किवीविरुद्ध कसोटी मालिकेत त्यांना 2-0 ने क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले. कोविड-19 मुले क्रिकेट ठप्प होण्यापूर्वी भारताचा 2020 मधील भारताची पहिली मोठी मालिका होती.
वनडे क्रमवारीत आयसीसी पुरुषांच्या वनडे टीम रँकिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडने भारतावर आपली आघाडी सहा वरून आठ गुणांनी वाढवली आहे. भारत दुसऱ्या तर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे. अव्वल दहा क्रमवारीत काही बदल झाला नाही. दुसरीकडे, क्रमवारीत बदल झाले असले तरी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतच्या गुणतालिकेत भारत अद्याप आघाडीवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रमवारीत भारताने 4 मालिकेत 9 सामन्यांपैकी 7 सामने जिंकले, तर 2 सामने गमावले आहेत. या विजयामुळे भारताने 360 गुणांसह पहिले स्थान कायम ठेवले आहे. ऑस्ट्रेलिया 296 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.