
Punjab Kings vs Rajasthan Royals: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 18 वा सामना शनिवारी पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स (PBKS vs RR) यांच्यात महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड (Maharaja Yadavindra Singh International Cricket Stadium, Mullanpur, Chandigarh) येथे खेळला जाणार आहे. या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहेत. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनच्या खांद्यावर आहे. या हंगामात, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने दोन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने तीन सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे.
हेड टू हेड रेकाॅर्ड (PBKS vs RR Head to Head)
आयपीएलच्या इतिहासात पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एकूण 28 सामने खेळले गेले आहेत. या काळात, राजस्थान रॉयल्सने वरचढ कामगिरी केली आहे. राजस्थान रॉयल्सने 16 सामने जिंकले आहेत. तर, पंजाब किंग्जने फक्त 12 सामने जिंकले आहेत. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच लढत असेल. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघ दोन सामन्यांमध्ये आमनेसामने आले होते. या काळात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला. पंजाब किंग्ज यावेळी पुनरागमन करू इच्छितात.
हे देखील वाचा: PBKS vs RR PCA Stadium Pitch Report & Weather: पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्या दरम्यान कशी असेल पिच आणि हवामान?
पंजाब किंग्जच्या या खेळाडूंनी राजस्थान रॉयल्सविरुद्ध केला आहे कहर
पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 12 डावात 33.27 च्या सरासरीने आणि 133.58 च्या स्ट्राईक रेटने 366 धावा केल्या आहेत. या काळात श्रेयस अय्यरने तीन अर्धशतकेही झळकावली आहेत. श्रेयस अय्यर व्यतिरिक्त, घातक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 15 डावात 30.58 च्या सरासरीने 367 धावा केल्या आहेत. गोलंदाजी: अनुभवी लेग-स्पिनर युजवेंद्र चहलने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 13 सामन्यांमध्ये 13.61 च्या सरासरीने 18 विकेट्स घेतल्या आहेत.
राजस्थान रॉयल्सच्या 'या' खेळाडूंनी पंजाब किंग्जविरुद्ध केला आहे कहर
राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने पंजाब किंग्जविरुद्ध आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. यादरम्यान, यशस्वी जयस्वालने 38.83 च्या सरासरीने आणि 144.44 च्या स्ट्राईक रेटने 221 धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वालच्या फलंदाजीतून 2 अर्धशतके झाली आहेत. यशस्वी जयस्वाल व्यतिरिक्त, संजू सॅमसनने पंजाब किंग्जविरुद्ध 23 डावात 2 अर्धशतकांच्या मदतीने 738 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत, राजस्थान रॉयल्सचा स्टार वेगवान गोलंदाज संदीप शर्माने पंजाब किंग्जविरुद्ध 25.56 च्या सरासरीने 9 बळी घेण्यास यश मिळवले आहे.
मुल्लानपूर स्टेडियमवर दोन्ही संघांची कामगिरी
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत महाराजा यादविंद्र सिंह क्रिकेट स्टेडियमवर 5 सामने खेळले गेले आहेत. या काळात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दोन सामने जिंकले. तर, दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी तीन सामने जिंकले आहेत. पंजाब किंग्जने येथे खेळलेल्या पाच सामन्यांपैकी फक्त एक जिंकला आहे आणि चार सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. राजस्थान रॉयल्सने या मैदानावर एक सामना खेळला आहे आणि तो जिंकला आहे. अशा परिस्थितीत, राजस्थान रॉयल्स आपला दुसरा विजय नोंदवू इच्छिते.