
PBKS vs RR PCA Stadium Pitch Report & Weather: पंजाबने या हंगामात आतापर्यंत दोन सामने खेळले आणि दोन्हीही जिंकले आहेत. राजस्थानने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांना फक्त एक जिंकता आला आहे आणि दोन गमावले आहेत. सॅमसन आज कर्णधारपद भूषवेल या सामन्यात संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करताना दिसेल. पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर, बीसीसीआयच्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सने 2 एप्रिल रोजी सॅमसनला विकेटकीपिंगची जबाबदारी स्वीकारण्याची आणि संघाचे नेतृत्व करण्याची परवानगी दिली. नियमित कर्णधार सॅमसन दुखापतीमुळे कर्णधारपद भूषवत नव्हता, त्याच्या जागी अष्टपैलू रियान परागला संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते.
पिच रिपोर्ट मोहालीच्या नवीन मैदानावर आयपीएलचा फक्त पाचवा सामना खेळला जात आहे. गेल्या वर्षी पंजाब किंग्जविरुद्ध मुंबई इंडियन्सने 192/7 अशी आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या नोंदवली होती. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 2 सामने जिंकले आहेत आणि पाठलाग करणाऱ्या संघाने 3 सामने जिंकले आहेत.
हवामानाबद्दलचा अंदाज असा की, मुल्लानपूरमध्ये धुसर सूर्यप्रकाश आणि ढग असतील. सामन्याच्या दिवशी इथे खूप दमट वातावरण असेल. तापमान 20 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. पावसाची अजिबात शक्यता नाही.
संभाव्य प्लेइंग
पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, सूर्यांश शेडगे, ग्लेन मॅक्सवेल, मार्को यान्सेन, युझवेंद्र चहल, लॉकी फर्ग्युसन, अर्शदीप सिंग, नेहल वढेरा.
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षणा, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, कुमार कार्तिकेय.