Happy Birthday Virender Sehwag: वडीलांनी घातली क्रिकेटवर बंदी;  टीम इंडियातून ठोकली 'Triple Century'; 'मुल्तान का सुल्तान' वीरेंद्र सहवाग याच्याबद्दलचे खास किस्से

विश्व क्रिकेटमधील सर्वात निर्भय फलंदाजांमध्ये गणना होणाऱ्या वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याचा आज वाढदिवस आहे. 20 ऑक्टोबर 1978 रोजी दिल्लीच्या नजफगड येथे जन्मलेल्या सेहवाग आज 41 वर्षांचा झाला आहे. आज सेहवाग सोशल मीडियावर त्याच्या हटके ट्विट्समुळे जितका प्रसिद्ध आहे तितकं त्याने आपल्या कारकीर्दीत अनेक ऐतिहासिक डाव खेळला. महान फलंदाज विव्हियन रिचर्ड्स (Sir Vivian Richards) यांच्याकडून कौतुक मिळवलेल्या उजव्या हाताच्या या स्फोटक फलंदाजाने आपल्या कारकीर्दीत अनेक ऐतिहासिक डाव खेळले आहेत जे कायमच संस्मरणीय ठरले. सेहवागने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकूण 38 शतकं केली आहेत. 1999 मध्ये सेहवागने पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध पहिला वनडे सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याने केवळ 1 धावा केल्या होत्या आणि 3 ओव्हरमध्ये 35 धावा लुटवल्या.

सेहवागच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्याच्या काही मनोरंजक किस्से आणि रेकॉर्ड:

1. सेहवाग 12 वर्षांचा होता तेव्हा एका क्रिकेट मॅचदरम्यान त्याचा दात तुटला होता, ज्याच्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट खेळण्यास बंदी घातली होती.  मात्र, आईच्या मदतीने त्याने पुन्हा एकदा क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

2. सेहवागने 2001 मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सेहवागचा कसोटी पदार्पण खूप धमाकेदार ठरला. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सेहवागने 105 धावा फटकावल्या. सेहवागने सचिनबरोबर 220 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. याच्यानंतर सहाव्या कसोटी सामन्यात सेहवागने सलामी फलंदाज म्हणून पदार्पण केले आणि पहिल्या दोन कसोटी सामन्यात त्याने 84 आणि 106 धावांची खेळी करून टीम इंडियामध्ये सलामीवीर म्हणून आपली जागा मजबूत केली.

3. 2003 मध्ये सेहवागने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये एक अशी खेळी केली जी कदाचित कोणीही विसरू शकले नसतील. मेलबर्न क्रिकेट मैदानावर सेहवागने केवळ 233 चेंडूत 195 धावा फटकावल्या.

4. याच्यानंतर सेहवागने रेकॉर्ड मोडण्याची जणू सुरुवातच केली. 2004 साली सेहवागने पाकिस्तानविरुद्ध मुल्तानमध्ये कसोटीत तिहेरी शतकी खेळी केली होती. टेस्टमध्ये तिहेरी शतक करणारा सेहवाग पहिला भारतीय फलंदाज बनला. या खेळीनंतर सेहवागला 'मुल्तानचा सुल्तानी असे म्हटले जाऊ लागले. याच्यानंतर 2008 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नई कसोटीत तिहेरी शतकी खेळी केली. या डावात सेहवागने केवळ 304 चेंडूंमध्ये 319 धावा फटकावल्या. सेहवागने केवळ 278 चेंडूत तिहेरी शतक केले.

5. सेहवागने त्याचा अंतिम टेस्ट सामने 2013 ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळाला. 37 व्या वाढदिवशी सेहवागने 2015 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

पहिल्या टेस्टमध्ये मध्ये शतक करणाऱ्या सेहवागची मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याशी तुलना केली जाऊ लागली. मधल्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सेहवागने नंतर सलामी फलंदाजाची व्याख्याच बदलून टाकली. भारतीय क्रिकेटच्या या सलामी फलंदाजाच्या खेळीला आजही आणि भविष्यातही कोणताही फलंदाज विसरू शकणार आणि त्यांना प्रेरणा मिळत राहील.